Head linesMEHAKARVidharbha

मेहकर मतदारसंघात खरी लढत डॉ. ऋतुजा चव्हाण व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच!

- हॅटट्रीक गाठण्यासाठी सज्ज आ. रायमुलकरांपुढे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निर्माण केले जबरदस्त आव्हान

– शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यामुळे ऋतुजा चव्हाणांचे बळ वाढले!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व वंचित, उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर – लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात विद्यमान आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासमोर मोठे जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. दोन शिवसेनेच्या टोकाच्या लढतीत डॉ. चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीदेखील ऋतुजा चव्हाण यांच्याच पथ्यावर पडणार आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत असून, मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप ऋतुजा चव्हाण यांनी मतदारांसमोर मांडलेला आहे.  आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरल्याने ही लढत आता अटळ असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना या मतदारसंघातून जोरदार लीड मिळाला होता. हा मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, दलित व बहुजन समाजाची मते ही प्रबळ असून, मराठा व ओबीसी समाजाचा ज्यांना कौल मिळतो, तो या मतदारसंघातून आमदार होत असतो. यावेळेस पहिल्यांदाच या मतदारसंघात परिवर्तानाची लाट निर्माण झालेली आहे. शेतकरी चळवळ व शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या पाठिंब्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे पारडे जड झाले असून, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मैदानात उतरले आहेत. गावोगावी जाऊन शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे डॉ. चव्हाण यांच्यासाठी शेतकरी, कष्टकरीवर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शेतकरीहितासाठी ऋतुजाताईंना निवडून देण्यासाठी साकडे घालत आहेत. दुसरीकडे, या मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा दलित, ओबीसी वर्गदेखील डॉ. ऋतुजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. किमान लाखाच्या फरकाने ताईंना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार महिला, तरूणवर्गाने केलेला आहे.

गावोगावी मिळतोय जोरदार पाठिंबा!

शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे गावभेट दौरे सुरू असून, या दौर्‍यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गावखेड्यातील मायमाऊल्या ऋतुजाताईंच्या चेहर्‍यावरून हात फिरवत त्यांना विजयासाठी मायेचा आशीर्वाद देत आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवायचेच, असा निर्धार मतदारांनीच केला असून, ही निवडणूक त्यांच्यावतीने लोकांनीच हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे, दोन शिवसेनेच्या लढाईत कट्टर शिवसैनिक व कार्यकर्ता होरपळला असून, ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाच्या उमेदवाराला गद्दार म्हणून तीव्र विरोध करत आहेत. तर शिंदे गटाचे नेते आम्हीच कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. तसेच, ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना उपरा म्हणून त्यांच्याच गटातील नाराज पदाधिकारी विरोधक करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराला वैतागलेली जनता नवा व फ्रेश चेहरा, तसेच विकासाचे व्हिजन असलेले सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना आपला पाठिंबा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!