Head linesMEHAKARVidharbha

डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने विरोधकांना भरली धडकी!

- व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण व्यवस्था परिवर्तन करू - डॉ. चव्हाण

– मेहकरात परिवर्तनाची धमक फक्त वंचित आघाडीतच – तय्यब जफर
– शेतकरी, कष्टकरीवर्गाचा आवाज म्हणून ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवा – डॉ. ज्ञानेश्वर टाले

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे. व्यवस्थेला दोष देण्यात बसण्यापेक्षा आपण व्यवस्था परिवर्तन करू, त्यातून विकास घडवून आणता येणे शक्य होईल, असे याप्रसंगी ऋतुजा चव्हाण यांनी सांगितले. तर मेहकरात यावेळेस वंचित बहुजन आघाडीच परिवर्तन घडवेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर यांनी व्यक्त केला. शेतकर्‍यांचे कल्याण पाहिजे असेल तर ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवा. शेतकरी, कष्टकर्‍यांच्या समस्यांना त्याच न्याय देऊ शकतील, असे शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले.

May be an image of 1 person, crowd and textवंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार व शेतकरी चळवळीचे समर्थन लाभलेल्या शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी २८ ऑक्टोबररोजी आपला मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विरोधकांच्या उरात धडकी भरवली. दोन्हीही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी, कष्टकरी यांच्यासह महिला व तरूण यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर यांनी महायुती सरकारच्या बहुजन, शेतकरीविरोधी धोरणाचे अक्षरशः वाभाडे काढले. तसेच, मेहकर मतदारसंघाला परिवर्तनाची गरज असून, हे परिवर्तन घडविण्याची धमक फक्त वंचित बहुजन आघाडीतच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. या मतदारसंघाचा विकास हवा असेल तर, डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदयाला केले.

May be an image of 10 people and daisतर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी विद्यमान लोकप्रतिनिधीवर कडाडून टीका केली. डॉ. ऋतुजा चव्हाण या नव्या दमाचे नेतृत्व आहे, मेहकर विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम त्या निश्चित करतील. या मतदारसंघाचे वारंवार आमदारकी भोगणार्‍या लोकप्रतिनिधींनी वाटोळे केले असून, या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी देशोधडीला लागले आहेत. शेतकर्‍यांना कुणीच वाली नाही, पीकविम्याचे पैसे नाही, कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. असेच चालू राहिले तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतील. तेव्हा ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवून, शेतकर्‍यांचा आवाज विधानसभेत पोहोचवा, असे आवाहन शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी याप्रसंगी केले. तर डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी राजकारणात प्रवेशामागची भूमिका विषद केली. राजकीय व्यवस्थेला नुसता दोष देऊन चालणार नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठी राजकीय व्यवस्थेत जावे लागेल. या मतदारसंघात सिंचनाची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही, तरूणांना नोकर्‍या नाहीत, आरोग्याचा प्रश्न आहे, शेतकर्‍यांचे प्रश्न तर गंभीर बनले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत जाणे गरजेचे आहे. तुमची लेक म्हणून माझ्या पदरात मताचे दान टाका, असे भावनिक आवाहनदेखील याप्रसंगी ऋतुजाताई चव्हाण यांनी याप्रसंगी केले.
May be an image of one or more people and weddingया जाहीर सभेला व रॅलीला वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर, शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, शेतकरी नेते ऋषांक चव्हाण, महेंद्र पनाड, दिलीप राठोड, मोबीन शाह, गजानन कावरखे, श्याम अवथळे, प्रफुल्ल देशमुख, गणेश गारोळे, महेश देशमुख, कैलास उत्पुरे, ओंकार चव्हाण, बबनराव वानखेडे, आबाराव वाघ यांच्यासह वंचित आघाडी, शेतकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!