देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘महायुती’चे सरकार पुन्हा येण्याचे संकेत!
- श्वेताताई महाले यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचे जनतेला आवाहन
– हजारो समर्थकांच्या साक्षीने आ. श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
चिखली (रघुनाथ गवई) – काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांप्रमाणे आम्हाला सत्ता प्रिय नसून, संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी कार्य करण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. या ध्येयाशी प्रामाणिक व कटिबद्ध असलेल्या आणि परिवर्तन म्हणजे काय असते ते आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातून दाखवून दिलेल्या श्वेताताई महालेंनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अडीच वर्षात केवळ अन्याय करणार्या व विकासविरोधी अशा झोपलेल्या मविआ सरकारशी संघर्ष केला, त्या कधीही थांबल्या नाहीत. त्यांनी शेतकरी व सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने आपला खजिना चिखली मतदारसंघासाठी खुला केला, आणि विकासाची दृष्टी असलेल्या आमदार श्वेताताई महाले यांनी विकासाचे नवे पर्व येथे सुरू केले. अशा जनतेशी बांधिलकी असलेल्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले ह्या तुमच्या सर्वांच्या मतदानरुपी आशीर्वादाने रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार, असा मला दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २८ ऑक्टोबर रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ना. फडणवीस चिखली येथे आले होते. यावेळी राजा टॉवर परिसरात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. केंद्रीय आयुष मंत्री शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिखली मतदारसंघातून महायुतीतर्पेâ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता खामगाव चौफुली येथील जिल्हा सहकारी बँकेच्या चौकातून भव्य रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चौक या मार्गाने राजा टावर येथे पोहोचली. तेथे रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, की तुमच्या चिखली मतदारसंघाला लाभलेल्या आमदार श्वेताताई महाले या अतिशय तडफदार कार्यतत्पर व विकासाची दृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अडीच वर्षात ग्रामीण आणि शहरी भागात प्रलंबित कामे तर मार्गी लावलीच शिवाय शेतरस्ते, जोडरस्ते, वीज समस्या, पाणी समस्या आदी मूलभूत प्रश्न सोडवले. गाव जोडणार्या रस्त्यांच्या माध्यमातून श्वेताताईंनी केवळ दोन गावांना जोडले नसून तेथील लोकांच्या मनांनासुद्धा जोडण्याचे काम केले आहे, असा अभिप्राय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. श्वेताताई पुन्हा निवडून येणारच आहेत आणि आपले सरकारही पुन्हा सत्तेत येईल तेव्हा एकाच वर्षात चिखली मतदारसंघातील क्षेत्र रस्त्यांचे सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही ना. फडणवीस यांनी दिली. , विधिमंडळाचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त करून आपल्या संसदीय कार्याची चुणूक आ. श्वेताताई महाले यांनी , दाखवून दिली. अशा कर्तव्यदक्ष आमदार असलेल्या श्वेताताई महाले यांना पुन्हा एकदा विधानसभेत चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
राजा टॉवरच्या मंचावर झालेल्या सभेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे यांचीदेखील भाषणे झाली. या सर्व वत्तäयांनी आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघात केलेल्या विविधांगी विकासकार्याचा उल्लेख करत त्यांनाच पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
खामगाव चौफुलीपासून रॅलीची सुरुवात झाली. प्रारंभीच तेथे असलेल्या स्वागत कमानीवर बसवण्यात आलेल्या ग्रामदेवता श्री रेणुका मातेच्या मूर्तीच्या प्रतिकृतीची महाआरती आ. श्वेताताई महाले यांनी केल्यानंतर ही रॅली पुढे सरकली. बस स्थानकासमोरील डीपी रोडवर असलेल्या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला आ. महाले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी वंदन केले. जयस्तंभ चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून केल्यानंतर आ. महाले यांनी महात्मा बसवेश्वर चौकामध्ये असलेल्या स्तंभाला अभिवादन केले. पुढे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर तहसील कार्यालयासमोर असलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आ. श्वेताताई महाले व उपस्थित नेत्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
आ. श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघ्ाालेल्या या राजकीय रॅलीलादेखील एक सांस्कृतिक किनार आयोजकांनी दिली. या रॅलीमध्ये भाजपासह महायुतीमधील विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि श्वेताताईंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेल्हारा परिसरातील भजनी दिंड्या मधील वारकरीदेखील टाळ – मृदंगाच्या गजरासह हरिनामाचा उद्घोष करत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याशिवाय बंजारा समाजातील भगिनींनी सामूहिक पारंपारिक नृत्य करत या रॅलीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे या रॅलीचे वेगळेपण उठून दिसले. अनेक ठिकाणी या रॅलीवर पुष्पवृष्टी करून आ. श्वेताताई महाले यांचे स्वागत करण्यात आले. चिखली मतदारसंघाच्या आमदार म्हणून आपल्या पहिल्याच कार्यकाळात श्वेताताई महाले यांनी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आपले प्रयत्न व पाठपुराव्यातून चिखली मतदारसंघात खेचून आणला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून आणलेल्या निधीमधून त्यांनी शेकडो विकासकामे केली. या कामांचा संक्षिप्त अहवाल सभेप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला. जनतेने दिलेल्या पाठिंबामुळेच मी ही कामे करू शकले अशी भावना व्यक्त करून आ. श्वेताताई महाले यांनी पुन्हा आपली सेवा करण्यासाठी चिखलीकरांनी मला आशीर्वाद द्यावे अशी विनंती यावेळी केली.
याप्रसंगी सभा मंचावर माजी आमदार तोताराम कायंदे माजी आमदार विजयराज शिंदे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा कबुतरे, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, सुनील वायाळ, शिवसेना तालुका उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मायाताई मस्के, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, चिखली शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस देविदास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे, श्रीरंगअण्णा येंडोले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला, संजय चेके आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन पंजाबराव धनवे व महेश लोणकर यांनी केले. चिखली मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना या महायुतीमधील पक्षांचे कार्यकर्ते व चिखली शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक हजारोच्या संख्येने सभेमध्ये सहभागी झाले होते.
फडणवीसांच्या सहकार्यामुळेच विकासकामे करू शकले – श्वेताताई महाले
तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षापूर्वी धनशक्तीविरुद्ध जनशक्ती या संघर्षात विजयी होऊन मी महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले. मात्र तेव्हा आलेल्या मविआच्या स्थगिती सरकारने मी जिल्हा परिषद सभापती असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी मिळवलेल्या कामांमध्ये खोडा घातला. एक रुपयाचाही निधी दिला नाही. त्यामुळे चिखली मतदारसंघाचा विकास खुंटला होता. परंतु, पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य व मार्गदर्शनात मी केवळ अडीच वर्षात मतदारसंघासाठी बरेच काही करू शकले. एवढ्यावरच मी समाधानी नसून या अडीच वर्षात हाती घेतलेली कामे पूर्ण करून नवीन विकासकामांची सुरुवात करण्यासाठी व चिखली मतदारसंघाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्या व राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणा अशी विनंती यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी केली.