बुलडाणा :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने 99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने बुलडाणा जिल्हयात उमेदवार जाहिर केले असून जळगाव जामोदमधून डॉ.संजय कुटे तर खामगाव मधून ॲड आकाशदादा फुंडकर तर चिखली मधून श्वेताताई महाले यांची नावे जाहिर केले आहे.
भाजपाने पुन्हा बुलडाणा जिल्हयात डॉ.संजय कुटे,आकाश फुंडकर,श्वेताताई महाले यांना पुन्हा संधी देण्यात आली.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे
2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या ? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.