DEULGAONRAJAMaharashtraSINDKHEDRAJAVidharbha

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचा पदाधिकारी बीएसएनएल टॉवरवर चढला!

- सिंदखेडराजा येथील काल रात्रीची घटना; धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत खाली न उतरण्याची घेतली भूमिका

किनगावराजा (सुरेश हुसे) – धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सिंदखेडराजा येथे बीएसएनएल टॉवरवर काल (दि.९) रात्री यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजाननभाऊ बोरकर हे युवक चढले असून, जोपर्यंत धनगर आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तहसीलदारांसह स्थानिक पोलिस व महसूल प्रशासन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु, अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही.

राज्यात धनगर समाजाचा एसटी प्रर्वगात समावेश करण्यासाठी धनगर समाजाने अनेक आंदोलने केली आहेत. तसेच नुकतेच राजमाता मॉ जिजाऊंच्या नगरीत तहसील कार्यालयावर मेंढी मोर्चादेखील काढण्यात आला होता. याची साधी दखलही राज्य सरकारने घेतली नसल्याने यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजाननभाऊ बोरकर (रा. सारंगपूर) यांनी काल सिंदखेडराजा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून यळकोट यळकोट जय मल्हार अशा घोषणा देऊन धनगर समाजाला एसटी समाजात आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल रात्रीपासून ते टॉवरवर असल्याने काही अनुचित घटना घडण्याची भीती वर्तविली जात आहे. जोपर्यंत समाजाला एसटी प्रर्वगात आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे, माजी नगरसेवक फकिरा जाधव यांनी आंदोलकासोबत चर्चा केली. सिंदखेडराजा पोलिसांनाही माहिती प्राप्त होताच, पोलीस कर्मचारी यांनीदेखील त्यांना खाली उतरण्याबाबत विनंती केली. मात्र ते आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून, खाली उतरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिस व प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!