नंदुरबार (प्रतिनिधी) गेल्या पंधरवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून आंतरमशागतीसाठी वेळ नसल्याने शेतात तन वाढले आहे वाढत्या ताणामुळे पिकाच्या वाढीवर ही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. निंदणी साठी शेतात पाणी असल्याने आंतरमशागत करता येत नसल्याने आंतर मशागतीचे कामं खोळंबली आहेत.
तर दुसरीकडे शेतातील ताण निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात फवारणी केेली जात आहे तणनाशकांच्या फवारणी मुळे पिकांवर ही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तणनाशकाची फवारणी करू नये. तणनाशकाची फवारणी करत असता कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर दुसरीकडे तणनाशकाच्या मागणीत वाढ झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणनाशकांचा तुटवडा निर्माण झाला आहे आता शेतकऱ्यांना पावसाची उघडीप कधी मिळते याची प्रतीक्षा लागून आहे.
Leave a Reply