नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मेसेज झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेले छोटे केटीवेअर बंधारे आणि लहान तलाव ओवरफ्लो झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. छोटे केटीवेअर आणि बंधारे यांच्यात पाणी झाल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होत असून ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
बंधारे भरून वाहत असून ग्रामीण भागातील नदी नाल्यांवर अशाच प्रकारचे बंधारे बांधण्यात येऊन पाणी अडविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची दुरुस्ती अभावी पाणी वाया जात असल्याने अशा प्रकारच्या बंधाऱ्यांची ही दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Leave a Reply