ChikhaliVidharbha

आमदार श्वेताताई महाले साधणार पुण्यातील चिखलीकरांशी संवाद!

- उद्या भोसरी येथे संवाद मेळाव्याचे आयोजन; स्नेहभोजनही पार पडणार!

चिखली/पुणे (महेंद्र हिवाळे) – नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कारणांमुळे पुणे येथे राहण्यास गेलेल्या मूळच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील युवक तसेच बंधू व माता-भगिनींच्या भेटीसाठी व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने आ. श्वेताताई महाले या रविवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे भेट देत आहेत. या भेटीदरम्यान पुण्यातील विविध विषयांवर चर्चा व गप्पा तसेच चिखलीकरांसोबत प्रितीभोजनाचा आनंददेखील आ.महाले घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील चिखलीकरांनी भोसरी येथील भोसरी गावठाण परिसरातील गाव जत्रा मैदानाजवळ असलेल्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

फार पूर्वीपासून विद्येचे माहेरघर म्हणून ख्यातीप्राप्त असलेले पुणे शहर आधुनिक काळात आयटी हब म्हणूनदेखील नावारूपास आलेले आहे. त्यामुळे पुणे येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातल्या विविध भागातील तरुणाई मोठ्या संख्येने स्थलांतरित झाली आहे. चिखली शहर व मतदारसंघातील तरुणसुद्धा मोठ्या संख्येने पुण्यात गेले असून, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला जम बसवला आहे. काहीजण उच्चशिक्षण घेऊन आपल्या नोकरी – व्यवसायाच्या नव्या वाटा शोधत आहेत. याव्यतिरिक्तदेखील अनेक वर्षांपासून पुण्यात नोकरी – व्यवसायानिमित्त स्थायिक झालेली बरीच कुटुंबे शहरातील वेगवेगळ्या भागात रहिवास करत आहेत. या सर्व चिखलीकरांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने आ. श्वेताताई महाले यांच्या या पुणे येथे भेट देत आहेत. त्यानिमित्त भोसरी येथील जुने गावठाण परिसरातील गावजत्रा मैदानाजवळ असलेल्या अंकुशराव लांडगे सभागृहात दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी आ. महेश लांडगे, आ. अश्विनीताई जगताप, आ. उमाताई खापरे, नगरसेविका आरतीताई कोंढोरे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आ. श्वेताताई महाले उपस्थितांशी सुसंवाद साधणार असून, त्यांच्यासोबत प्रीती भोजनाचा आस्वाददेखील त्या घेणार आहेत. सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२३१००८०७, ८१४९३५५५१९, ९१३०१७८३९२, ९९७०४७२४१९ किंवा ९४०४०४५६५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अथवा वरील क्रमांकावर आपले नाव, संपर्क क्रमांक व पत्ता पाठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!