Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

२६ नोव्हेंबरपूर्वीच विधानसभेच्या निवडणुका!

- केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

– दिवाळीनंतर निवडणुका घेण्याची आयोगाला राजकीय पक्षांची सूचना
– ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – दिनांक २६ नोव्हेंबररोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात. काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आदी राजकीय पक्षांनी निवडणुकीसंदर्भात काही सूचना, विनंती केल्या आम्ही त्या ऐकून घेतल्या. दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या तारखांचा विचार करावा, अशा सूचना सर्वच पक्षांनी केल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगून, ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणू्क आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांनी पत्रकार परिषदे घेऊन दोन दिवसातील आढाव्याची आणि तयारीची माहिती पत्रकारांना दिली.

Imageकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर आज विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक तथा इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकीसंबंधीची मते जाणून घेतली. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या दौर्‍याचा तपशील सादर केला. राजीव कुमार म्हणाले, ‘आम्ही महाराष्ट्र दौर्‍यात ११ पक्षांसोबत चर्चा केली आहे. आम्ही आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान, अशी टॅगलाइन घेण्यात आली आहे. दिवाळी, देव दिवाळी यासारखे सण-उत्सव आहेत. त्या गोष्टी पाहूनच निवडणुकीची घोषणा करावी. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना लागोपाठ सुट्ट्या येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्याव्यात. जेणेकरुन लोक सुट्ट्या घेऊन बाहेर जाऊ नयेत. लोकांनी मतदान करावे’, असेही राजीवकुमार यांनी सांगितले. निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणार्‍या वाहनांवर रात्री ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रूग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने सुविधा पोर्टल नामक एक अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.


Imageरश्मी शुक्लांविषयी तक्रार प्राप्त

राजीव कुमार यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत आयोगातर्पेâ करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले, ३ वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असणार्‍या विशेषतः स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग असणार्‍या अधिकार्‍यांची तत्काळ बदली केली जाईल. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविषयी तक्रार मिळाली आहे. त्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. ट्रान्सफर व पोस्टिंगमध्ये पूर्ण पारदर्शकता राबवली जाईल. निवडणुकीची वेळ, टप्पे व तारीख लवकरच जाहीर केली जाईल. राज्यात १.८६ लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ५२५८५ केंद्र शहरी भागात, तर ५७,६०१ केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील. विशेषतः ३५० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरूणांकडे असेल, असे राजीव कुमार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!