Head linesMEHAKARPolitical NewsPoliticsVidharbha

शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेहकरात गुरूवारी भव्य परिवर्तन मोर्चा!

- विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची तोफ धडाडणार!

– शेतमालाला कवडीमोल भाव, कर्जमाफीही नाही, शेतकर्‍यांची नुसती थट्टा!
– मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न ही टांगणीला, बेरोजगारांचे हात रिकामे!

मेहकर (तालुका प्रतिनिधी)- शेतमालाला कवडीमोल भाव असल्याने खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे भाववाढ करावी, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न रखडला असल्याने बेरोजगारांना काम नाही, यासह जनहिताच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात गुरुवार, दि. ३ ऑक्टोबररोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची तोफ धडाडणार असून, विविध मान्यवरदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चातून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांतील राजकीय मरगळ झटकली जाण्याची शक्यता असून, शिवसेना (ठाकरे) आपला हक्काचा हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार कामाला लागणार असल्याने या परिवर्तन मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

May be an image of 3 people, dais and textसोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल, कपाशी व तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मेहकरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा, जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार विकास आराखड्याची कामे पूर्ण करा, मंजूर घरकुलांचे थकीत अनुदान तात्काळ द्या, बेरोजगारांच्या हाताला काम द्या, मेहकर व लोणार तालुक्यातील पाणंद व शेतरस्ते ताबडतोब करून द्या, मेहकर व लोणार तालुक्यातील स्मशान व दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, यासह इतर जनहिताच्या मागण्या घेऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात गुरुवार, दि. ३ ऑक्टोबररोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे यांसह जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख शहरप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना तसेच विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोर्चाची सुरूवात स्थानिक जानेफळ रोडवरील शिवसेना (ठाकरे) कार्यालय येथून सकाळी ११ वाजता होणार आहे. उपविभागीय अधिकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर स्थानिक स्वतंत्र मैदानावर जाहीर सभेत होणार आहे. तरी या भव्य परिवर्तन मोर्चाला मेहकर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी, बेरोजगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांना वाचा फोडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चा यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!