कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कांदा, सोयाबीनला चांगला भाव मिळण्याचा मार्ग मोकळा!
- सोयाबीनची हमीभावाने खरेदी, तेलावरील आयातशुल्कही वाढवले!
– कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; केंद्राकडून निर्यात शुल्कातही २०% कपात; केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेतकर्यांना मोठा दिलासा!
बीड (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यासह देशभरात उत्पादित झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयातशुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सोयाबीनचे भाव वाढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार, केंद्राने हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दल मंत्री मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत. मंत्री मुंडे यांनी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे. तसेच सोयाबीनच्या निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान ५० डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्या होत्या. या तीनपैकी दोन मागण्यांची पूर्तता केंद्र सरकारने केली असून, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, की राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टरपेक्षा जास्त झाला आहे. तसेच, यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकर्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न सुरू होते. केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे. तसेच सोयाबीनच्या निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान ५० डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्या होत्या. या प्रयत्नांना केंद्राने सकारात्मक यश दिले असून, केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची ९० दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काल खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण केलेल्या ३ पैकी २ मागण्या मान्य केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत आहोत, असेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
———-
सोयाबीनची हमीभावाने खरेदी व्हावी, सोयाबीन तेलावर आयातशुल्क लावण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील आंदोलन केले होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील बैठकीतही तुपकरांनी ही मागणी रेटली होती. अखेर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाल्याने रविकांत तुपकर यांची मागणीदेखील यानिमित्ताने आपसूक निकाली निघाली आहे. या निर्णयाचे श्रेय कुणीही घेण्याचा प्रयत्न केला तरी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे व शेतकरीहिताच्या भूमिकेमुळेच सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळू शकल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
———-
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; केंद्राकडून निर्यात शुल्कातही २०% कपात
केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवले आहे. त्याचप्रमाणे निर्यात शुल्कामध्ये २० टक्के कपात करीत कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे. वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीने एक अध्यादेश शुक्रवारी जारी झाला. सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून, तसेच निर्यातशुल्कही निम्मे कमी करून २० टक्क्क्यांवर आणल्याने निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यातीची संधी आहे.