Breaking newsHead linesMaharashtra

मराठा आरक्षण, शेतकरीप्रश्नी मनोज जरांगे पाटलांशी राज्य सरकारची भल्यापहाटे चर्चा!

– राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्यात मंत्री अब्दुल सत्तार यांची मध्यस्थी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य सरकारमधील मंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आज (दि.५) पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल तीन तास चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील फोनवर चर्चा केली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलेले आहे. दुसरीकडे, शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरीप्रश्नी सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. तुपकरांचेच सर्व मुद्दे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याचीही खात्रीशीर माहिती असून, शेतकरीप्रश्नांची सोडवणूक करण्याचे श्रेय तुपकरांना मिळणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचेही खात्रीशीर सूत्रांचे खासगीत मत आहे.

मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान - Marathi News | abdul sattar big statement about manoj jarange patil and maratha reservation issue ...दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेण्यासाठी राज्य सरकारकडे आता केवळ ६० दिवस उरले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या चर्चेत शेतकर्‍यांच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बातचीत करणार आहे. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. त्यामुळे शेतकरी व मराठा आरक्षणप्रश्नी आज काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर, शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, यासह मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकर्‍यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकर्‍यांची उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे नकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याशिवाय, चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील फोनवरती चर्चा झाल्याचा मनोज जरांगे यांनी सांगितले असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!