परभणी (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यात ज्या ठिकाणी ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, असा भाग अतिवृष्टीखाली येतो, असे सांगत तिथे पंचनामे करण्याची गरज नाही, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याठिकाणी शेतकर्यांना सरसकट मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी आज परभणी येथे केली. तसेच, पीकविम्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.
बीड, परभणी, नांदेड अशा जिल्ह्यातील ४७ महसुल मंडळांमध्ये ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज गेवराई तालुक्यात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच परभणी येथेही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत, थकीत पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.