डुडुळगाव इंद्रायणी नदीत वेदश्री तपोवनचे तीन साधक विद्यार्थी बुडाले
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील डुडुळगाव ( ता.हवेली ) येथून वाहणा-या इंद्रायणी नदीत वेदश्री तपोवन या संस्थेत वेदांचे शिक्षण घेणारे तीन साधक विद्यार्थी बुडातयाची दुर्दैवी घटना सोमवारी ( दि. १९ ) सकाळी नौचे सुमारास घडली. या घटनेतील एक मुलास बाहेर काढल्या नंतर उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर दुस-या मुलाचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. अजून तीस-या मुलाचे शोध कार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
श्रावण निमित्त नदी पूजन विधीसाठी डुडुळगाव येथील नदी काठा वरती मुले उतरले होते. हे सर्व वैदिक विद्यार्थी नदी पूजनासाठी इंद्रायणी नदीच्या काठी डुडूळगाव येथे गेले होते. आळंदीपासून जवळच असलेल्या डुडुळगाव येथील इंद्रायणी नदी पात्रात वेदश्री तपोवन चे तीन विद्यार्थी बुडाल्याही माहिती वा-यासारखी पसरली. ही दुर्दैवी धक्कादायक घटना सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली. या घटणे नंतर शोध कार्य तात्काळ सुरु करण्यात आले. यातील मुले १२ ते १६ या वयोगटातील असून श्रावण निमित्त नदी पूजनासाठी सर्व विद्यार्थी इंद्रायणी नदीच्या तीरावर डुडुळगाव येथे नदीकाठा वर आले होते. नदी मध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यां पैकी दोन विद्यार्थी वाहत जात असताना त्यांना वाचवण्यासाठी जय दायमा ( नाशिक ) येथील राहणार विद्यार्थ्यांने नदीमध्ये उडी घेतली. मात्र त्याला वाचवण्यात यश आले. परंतु उपचार दरम्यान त्याचे निधन झाले. नदी पात्रातून दोन विद्यार्थी पैकी एक मृत विद्यार्थी ओंकार पाठक मिळून आला आहे. या शिवाय तिस-या विद्यार्थ्याचे प्रणव पोतदार याचे शोध कार्य चालू आहे.
या शोध कार्यास आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, दिघी पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन येथील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी या बुडालेल्या विद्यार्थ्यांचे शोध कार्यात परिश्रम घेतले असून अजून शोध कार्य सुरु आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटना स्थळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी भेट देत पाहणी केली. पोलीस प्रशासन, अग्निशामक दल यावेळी शोध कार्यास उपस्थित होते. परिसरातील नागरिक, पदाधिकारी यांचे सह आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिवसभर शोध कार्य मदत पथकास मदत केली.