अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे माजी मंत्री आमदार के.सी.पाडवी यांनी केली पाहणी
नुकसान झालेल्या रस्ते पुलांचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश
पंचनामे करुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत
मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार
नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- गेल्या आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि रस्ते आणि पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचा सर्वाधिक फटका धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांना बसला होता. देव नदीला आलेल्या पुरात वडफळी येथील शासकीय आश्रम शाळेत पुराचे पाणी शिरले होते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली.
त्यासोबत नर्मदा काठावर अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्ते आणि पुलांच्या नुकसानीच्या दुरुस्तीच्या सूचना ही दिली आहेत. त्यासोबत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता नुकसानीचे पंचनामे करून दिलासा द्यावा,अशी मागणी माजी मंत्री के. सी.पाडवी यांनी केली.