BULDHANAHead linesVidharbha

दीड हजारांच्या लाभासाठी ‘लाडक्या बहिणीं’चे तुफान अर्ज!

– ‘लाडकी बहिण’ योजनेच्या अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण
– तालुकास्तरावरील छाननीनंतर आता जिल्हास्तरावर छाननी, नंतर प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रतीक्षा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेला महिलांनी तुफान प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील ३ लाख ८६ हजार ६९८ अर्जांची तालुकास्तरावर छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जांची छाननी करण्यात जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे.

ऑनलाईन प्राप्त अर्जामध्ये मेहकर तालुक्यात ४२ हजार ९५९ अर्जापैकी ४२ हजार ९५६, बुलढाणा तालुक्यात ३८ हजार ८०२ अर्जापैकी ३८ हजार ७९९, लोणार तालुक्यात २५ हजार ६६१ अर्जापैकी २५ हजार ६५७, खामगाव तालुक्यात ४७ हजार ६२० अर्जापैकी ४७ हजार ६०७, संग्रामपूर तालुक्यात २३ हजार २०६ अर्जापैकी २३ हजार १९८, चिखली तालुक्यात ४२ हजार ६३० अर्जापैकी ४२ हजार ६१३, नांदुरा तालुक्यात २५ हजार २२५ अर्जापैकी २५ हजार २११, शेगाव तालुक्यात २१ हजार ४१२ अर्जापैकी २१ हजार ४००, देऊळगाव राजा तालुक्यात १८ हजार २७५ अर्जापैकी १८ हजार २५६, जळगाव जामोद तालुक्यात २४ हजार ४९ अर्जापैकी २३ हजार ९९४, सिंदखेड राजा तालुक्यात २९ हजार ५४ अर्जापैकी २८ हजार ९७१, मोताळा तालुक्यात २४ हजार १८९ अर्जापैकी २४ हजार ११३, मलकापूर तालुक्यात २३ हजार ९९९ अर्जापैकी २३ हजार ९२३ अर्जांची छाननी तालुकास्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. तालुकास्तरावर ३ लाख ६९ हजार ५०७ अर्ज स्विकृत करण्यात आले. यातील ३ लाख ८६ हजार ६९८ अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे.


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे दाखल करण्यात आलेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईनरित्या दाखल करण्यात येत आहे. ऑनलाईन दाखल सर्व अर्जांची तालुकास्तरावर छाननी करण्यात येते आहे. तालुकास्तरावर स्विकृत करण्यात आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरावर येणार आहे. यात अर्जाची जिल्हास्तरावरील समितीतर्पेâ पडताळणी होणार असून, त्यानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!