बालमटाकळी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रामनाथ राजपुरे, व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय भिसे बिनविरोध
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामनाथ राजपुरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मावळते चेअरमन माणिकराव शिंदे व व्हाईस चेअरमन विश्वंभर गरूड या दोघांनीही ठरलेल्या रोटेशनप्रमाणे आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.
त्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मंगळवारी, दि.२ जुलैरोजी बैठक घेण्यात आली असता, चेअरमनपदासाठी रामनाथ राजपुरे तसेच व्हाईस चेअरमनपदासाठी दत्तात्रय भिसे या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने सदरची निवड ही बिनविरोध होत असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. यू. लकवाल यांनी जाहीर केले. तसेच रामनाथ नामदेव राजपुरे यांच्या नावाची सूचना हरिचंद्र घाडगे यांनी केली तर तर त्यास विश्वंभर गरुड यांनी अनुमोदन दिले असून, व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिसे यांच्या नावाची सूचना उमेश घाडगे यांनी केली व त्यास रोहिदास भोगले यांनी अनुमोदन दिले आहे. बालमटाकळी सेवा संस्था तालुक्यात आर्थिकदृष्ट्या मोठी संस्था समजली जात असून, संस्था स्थापनेपासून स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्यापासून ते आजपर्यंत माजी आ. नरेंद्र घुले पाटील व माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ.क्षीतिज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक व्ही. यू. लकवाल यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव भीमराज निर्मळ यांनी मदत केली. यावेळी सरपंच डॉ. राम बामदळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, कासमभाई शेख, प्रशांत देशमुख, हरिश्चंद्र घाडगे, माणिकराव शिंदे, अशोक वैद्य, रोहिदास भोगले, अर्जुन राजपुरे, रतनराव देशमुख, छगनराव राजपुरे, विश्वंभर गरुड, परशुराम घोरपडे, विष्णुपंत वाघुम्बरे, बाबा सोनवणे, ज्ञानेश्वर माळी, विठ्ठल देशमुख, गजानन देशमुख, गणेश शिंदे, धनंजय देशमुख, गणेश शेवाळे, शिवा राजपुरे, भाऊसाहेब बामदळे, अमोल बामदळे, बाळासाहेब जाधव, उमेश घाडगे, रमेश वाघ, अमोल गायके यांच्यासह आदींनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सन्मान करून अभिनंदन केले आहे.