SINDKHEDRAJA

वीजेअभावी सिंदखेडराजा तहसीलमध्ये भरदिवसा अंधार!

– जनरेटर बनले शोभेची वास्तू?; तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – येथील तहसील कार्यालयात वीज (लाईट) नसल्याने हे तहसील कार्यालय भरदिवसा अंधारात बुडाले असून, संगणक बंद असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तसेच, विविध दाखले व कागदपत्रे काढण्यासाठी महिला व ग्रामस्थांमुळे या तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आलेले आहे. येथील जनरेटर फक्त शोभेचे वस्तू बनले असून, नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तहसील कार्यालयात अधिकारीवर्गात ताळमेळ नसल्यामुळे तसेच कुठलाही तहसीलदार नसल्यामुळे दूरहून आलेल्या महिलांचा व नागरिकांचा हिरमोड बघायला मिळाला.

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी खेडोपाड्यातून आलेल्या महिलांची भलीमोठी रांग बघायला मिळत असून, परवा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्टॅम्प विक्रेते यांच्याकडून स्टॅम्प खरेदी करण्याकरता महिलांची रांग लागली होती. भर पावसामध्ये महिला रांगेमध्ये उभ्या होत्या. त्यामुळे महामार्ग असल्यामुळे अपघाताचा धोकासुद्धा होता. तर स्टॅम्प विक्रेते १०० रुपयाच्या स्टॅम्प ११० रुपयाला देत होते. तर जन्ममृत्यू विभाग पंचायत समिती कार्यालयामध्येसुद्धा जन्मतारखेचा दाखला काढण्याकरता जवळपास ५०० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होते. त्याचबरोबर सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये एका कोपर्‍यात असलेल्या रेशन विभागांमध्ये अनेक महिला पुरुष रेशन कार्ड काढण्याकरता त्याचबरोबर त्यामध्ये नावे समाविष्ट करण्याकरता आले होते. परंतु वीज नसल्यामुळे तसेच कुठलाही कर्मचारी हजर नसल्यामुळे अनेक नागरिक रेशन विभागाच्या दरवाजासमोर खाली बसलेले बघायला मिळाले. ढगाळ वातावरण असल्यामुळे संपूर्ण तहसील कार्यालय अंधारमय झाले होते. तर तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेले जनरेटर असूनसुद्धा जनरेटर सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे जनरेटर फक्त शोभेची वस्तू बनली असून, या जनरेटरचे डिझेलकरिता लागणारे बिले मात्र काढण्यात आली आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. लाडली बहीण योजनेचे कामे सध्यातरी रेंगाळल्याचे चित्र बघायला मिळत असून, महिलांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!