बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात आज (दि.21) सकाळी 7 वाजता दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात योगक्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. दीपप्रज्वलन करून योग कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार व्ही. एस. कुमरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, नेहरू युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, देशभरात प्रत्येक ठिकाणी हजारो नागरीक योग दिनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतात. तसेच निरामय आयुष्य जगण्याची जीवनशैली अंगीकारत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तालुका क्रीडा संकुलांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व रक्तदान शिबीर घेण्यात आले. विशेषतः युवकांनी रक्तदान व नियमीत योग करण्याचे आवाहन केले.
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशानूसार अंजली परांजपे, प्रशांत लहासे, भुषण मोरे, सचिन खाकरे, उर्मिला दिदी, कुंदा पंधाडे, अच्युतराव उबरहंडे, बालयोगी क्षितीज निकम, साई वानखेडे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम हे प्रकार करुन घेतले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उर्मिला दिदी यांच्या प्रार्थनेने योगदिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच योग दिनानिमित्त जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलातील हॉलमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.
क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, वरिष्ठ लिपीक संजय मनवर, सुरेशचंद्र मोरे, मनोज श्रीवास, विनोद गायकवाड, नम्रता वाचपे, शेख रफीक, मंगलाबाई पसरटे, सुहास राऊत, किसना जाधव यांनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सहकार विद्या मंदिर, शारदा ज्ञानपीठ, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, सेंट जोसेफ इंग्लिश स्कुल, भारत विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग महाविद्यालय, ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालय, एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच एडेड विद्यालय, प्रबोधन विद्यालय, महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.