ChikhaliVidharbha

मिसाळवाडीत सर्वाधिक चालला ‘पाना’!

– रेल्वेरोको आंदोलनाची घोषणाही झाली होती मिसाळवाडीतून; ग्रामस्थांनी दिला होता एक लाखाचा निधी!

चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकरी नेते तथा लोकसभेतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना मिसाळवाडी गावातून सर्वाधिक मतदान झाले आहे. ७०० लोकवस्तीच्या या गावातून ५९२ इतके मतदान झाले होते. पैकी तब्बल ४५१ इतकी मते तुपकर यांना मिळाली आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांची जाहीर सभा येथे झाली होती. याच सभेतून शेतकरी व सोयाबीनप्रश्नी रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा तुपकरांनी केली होती. तसेच, तुपकरांना निवडणुकीसाठी एक लाख रूपयांचा निधीही मिसाळवाडी ग्रामस्थांनी दिला होता.

राज्याला प्रशासन, सिनेमा, पत्रकारिता, शिक्षण यासह विविध क्षेत्रात मान्यवर देणारे गाव म्हणून मिसाळवाडी गावाची ओळख आहे. या गावात विविध राजकीय पक्षांना मानणारे नेतृत्व कार्यरत असताना, शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत पोहोचावा, या एकमेव भावनेतून गावाचे सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ताकद देण्याचा निर्णय गावातील मान्यवरांनी व सर्व ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार, तुपकर यांची भव्य एल्गार सभाही गावात पार पडली होती. या सभेला ज्येष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे संपादक पुरूषोत्तम सांगळे यांच्यासह शिक्षणमहर्षि तथा या भागातील ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे, प्रकाश आबा पाटील, इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, कोनडचे सरपंच अजाबराव जावळे, ज्येष्ठ शेतकरी नेते भानुदास पाटील घुबे, चिखली बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण मिसाळ, शेतकरी नेते विनायक सरनाईक, युवा शेतकरी नेते राजू पाटील भुतेकर, पिंपळवाडीचे युवा नेते राहुल मिसाळ, शेनफड पाटील सुरूशे, खामगावातील आक्रमक आंदोलनामुळे चर्चेत आलेले शेतकरी रवी महानकार, दीपक घुबे, पत्रकार भिकनराव भुतेकर, नितीन राजपूत, भगवान मोरे, भारत वाघमारे, बबनराव चेके, रामेश्वर अंभोरे, दत्तात्रय जेऊघाले, गजानन घुबे, भगवान परिहार, राजूभाऊ मिसाळ, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, माजी सरपंच देवीदास मिसाळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्रभावी वक्ते शिवश्री प्रवीण मिसाळ, पोलिस पाटील रवी पाटील मिसाळ, गजानन मिसाळ, किशोर सुरडकर, ज्ञानेश्वर बुरकूल यांच्यासह पिंपळवाडी, कोनड, अमोना, शेळगाव आटोळ, इसरूळ, मंगरूळ, अंचरवाडी, भरोसा येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थिती होती.


संपूर्ण मिसाळवाडी गावातील तरूणांनी तुपकरांचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत झोकून दिले होते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ५९२ इतके सर्वाधिक मतदान झाले. त्यात रविकांत तुपकर यांना ४५१ इतकी मते मिळाली असून, खासदार प्रतापराव जाधव यांना १२ मते, नरेंद्र खेडेकर यांना २२ मते तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांना १०७ मते मिळाली आहेत. मिसाळवाडी हे गाव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नेतृत्व मानणारे आहे, सरपंच बाळू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, उपसरपंच हनुमान मिसाळ हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आहेत. तरीदेखील लोकसभेला आमच्या मनाप्रमाणे मतदान करू द्या, विधानसभेला संपूर्ण गाव एकजुटीने तुम्हालाच मतदान करेल, अशी ग्वाही ग्रामस्थांनी डॉ. शिंगणे यांना दिली होती. दरम्यान, मिसाळवाडी गावाच्या सहकार्याबद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच, कधीही हाक द्या, तुमच्यासाठी धावून येईल, अशी ग्वाही दिली आहे.
———-

शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा १९ तारखेला मलकापुरातून दिल्ली, गुजरातकडे जाणार्‍या रेल्वे रोखणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!