पारनेर (प्रतिनिधी) : टाकळी ढोकेश्वर परिसरातील ऐतिहासिक देवस्थान असलेले ढोकेश्वर मंदिर हे एक आध्यात्मिक व पर्यटनीय ठिकाण आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त व पर्यटक नेहमीच भेट देत असतात. टाकळी ढोकेश्वर येथे नव्याने सुरू झालेल्या स्वराज्य अकॅडमी या स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी ढोकेश्वर मंदिर परिसरामध्ये मध्ये जात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी अत्यावश्क कचरा पडलेला होता. हे पाहताच विद्यार्थ्यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली व मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर बनविला.
स्वराज्य अकॅडमी टाकळी ढोकेश्वर येथील विद्यार्थ्यांनी हा राबवलेल्या उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संदेश दिला आहे. स्वराज्य अकॅडमीचे सचिन मोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ढोकेश्वर मंदिर हे खऱ्या अर्थाने आपल्या परिसराला ऐतिहासिक वरदान लाभले आहे. या ऐतिहासिक वास्तूची आपण सर्वांनी जपवणूक करणे गरजेचे असून, या ठिकाणी येणारे भाविक भक्त हे राज्यातून येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये स्वच्छता ठेवून आपण आदर्श जपला पाहिजे, त्यासाठी आमच्या स्वराज्य अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात जाऊन ढोकेश्वरांचे दर्शन घेतल्या नंतर स्वच्छता मोहीम राबविली. आमचे सर्व विद्यार्थी या साफसफाई स्वच्छता उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. मंदिर परिसर स्वच्छ झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणावरून माघारी निघाले. तसेच मोरे पुढे म्हणाले की, विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घडतो. स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना बाह्य भौगोलिक ज्ञानाचाही पुरेपूर मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी आम्ही असे सामाजिक उपक्रम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी यापुढील काळात राबविणार आहोत.
Leave a Reply