कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. विक्रमसिंघे ६ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. याआधी त्यांनी राजकीय गोंधळात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आर्थिक संकट ओढवलेल्या श्रीलंका देशाची लोकसंख्या जवळपास २२ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे विक्रमसिंघे यांच्यासमोर आता देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान असेल. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधन, औषधी यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे.
राष्ट्राध्यक्षपदासाठी तीन नावे शर्यतीत होती. पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमासिंघे, दलस अलापेरुमा आणि डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपुल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके हे तिघे रिंगणात होते. रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे ८ वे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. संसदेत २२३ जणांनी मतदान केले त्यातील १३४ जणांनी विक्रसिंघे यांना पाठिंबा दिला. रनिल यांना कडवी टक्कर देणारे सत्तारूढ पक्षाचेच असंतुष्ट उमेदवार दलस अलापेरुमा होते. विरोधी पक्षाने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. नवे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांचा उर्वरित कालावधी पूर्ण करेल.
राजपक्षे देश सोडून पळून गेल्यानंतर ते काळजीवाहू म्हणून काम करत होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिले मत स्पीकरने तर दुसरे मत रानिल विक्रमसिंघे यांनी दिले. २२३ सदस्यांच्या संसदेत दोन खासदार गैरहजर होते. राष्ट्रपतीपदासाठी एकूण २१९ जणांनी मतदान केले. मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मतमोजणीदरम्यान, ४ मते अवैध ठरविण्यात आली. यामध्ये विक्रमसिंघे यांना तब्बल १३४ मतं मिळाली. विक्रमसिंघे हे यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र यावेळी त्यांनी बाजी मारली. त्यामुळे आता विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती असणार आहे. दरम्यान, श्रीलंकेतील कोलंबोस्थित राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून आंदोलकांना बाहेर काढण्यात आले असून, राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आता श्रीलंकेच्या सैन्याने आपल्या नियंत्रणात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवासस्थानात आंदोलक होते.
Leave a Reply