बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) – खते, बी- बियाणे आणि कीटकनाशकाबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे खते व कीटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी येतात. ह्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर कृषी निविष्ठा नियंत्रण कक्ष खरीप हंगाम 2024 स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये चिखली तालुक्यासाठी कृषी अधिकारी भगवान कुलकर्णी व एस.आर.सोनुने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे खते व कीटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारींचे वेळीच निराकरण होणे गरजेचे आहे. बियाणे खते व कीटकनाशके यांचे उत्पादन प्रक्रिया, वाहतूक वितरण आणि विक्री करताना अडचणी निर्माण होतात. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी उत्पादन वितरण आणि विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेत संपर्क साधता येऊ शकणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक वर संपर्क करता येणार आहे. बियाणे खते आणि कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधित तक्रारी निवारण सुविधा केंद्राची रचना जिल्हा व तालुका स्तरावर राहणार आहे.
जिल्हास्तर मोहीम अधिकारी व्ही एल खोंदील, जिल्हा कृषी अधिकारी डी एम मेरत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए के इंगळे, ग्रामविकास अधिकारी जे एस वायाळ, कृषी सहाय्यक ए व्ही शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकास्तरावर कृषी विभाग पंचायत समिती कार्यालयाकडून बुलढाणा येथे कृषी अधिकारी भास्कर राहणे, प्रीती पाटील, चिखली कृषी अधिकारी भगवान कुलकर्णी, एस आर सोनुने, मलकापूर गजानन पखाले, एस ए गवई, मोताळा वाय बी महाजन, एस ए गवई, खामगाव एस टी धुमाळ, ए बी चव्हाण, शेगाव जे आर पवार, आर एस नावकर, नांदुरा शरद पाटील, संजय राऊत, जळगाव जामोद एस वाय सावंत, ए बी चव्हाण, संग्रामपूर एस एन पाटोळे, आर एस नावकार, मेहकर उद्धव काळे, एस आर परिहार ,लोणार एस एन कावरखे, एस बी गायकवाड, सिनखेडराजा गोपाल बोरे, अंकुश मस्के, देऊळगाव राजा एम ए इल्लरकर,कुणाल चिंचोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी निविष्ठा बाबत बियाणे, खते व कीटकनाशके याबाबत तक्रारी असल्यास संबंधितास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.