BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

‘वंचित’चे वसंतराव मगर यांनी नेमकी कोणाची विकेट घेतली?; निवडणूक झाली, आता तर्कवितर्कला उधाण!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – बुलढाणा लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अचानक वसंतराव मगर यांचे नाव जाहीर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्या व्यक्तीचा वंचित बहुजन आघाडीसोबत कोणताही संबंध नव्हता आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी नव्हती, अशा व्यक्तीला रिंगणात उतरवून नेमकी कोणाची विकेट घ्यायची होती? आणि गेम कोणाचा होणार? यावर आता गावगप्पांना जोर आला असून, जोरदार चर्चा रंगायला लागल्या आहेत.
https://breakingmaharashtra.in/

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात घाटावर चार आणि घाटाखाली दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. घाटावरील मेहकर विधानसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर हे निवडणूक रिंगणात होते. जाधव आणि मगर यांची दोस्ती ही पहिल्यापासून. मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव तर सिंदखेडराजा मतदारसंघात वसंतराव मगर शिवसेनेचे उमेदवार होते. दोघांचाही पराभव झाला असला तरी दोघांनी नंबर दोनची मते घेतली होती. नंतर वसंत मगर यांनी छगन भुजबळ जातील त्या रस्त्याने गेले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीत नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाही २०१९ च्या निवडणुकीत पिछाडीवर टाकून प्रतापराव जाधव यांनी मताधिक्य घेतले होते. निवडणुका येतात जातात, पण पराभवाची सल कार्यकर्त्यांना असते. यावेळी याच मतदारसंघातील रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. तसाही हा मतदारसंघ अपक्षांना खांद्यावर घेणारा मतदारसंघ आहे. वैâ. भास्करराव शिंगणे, तोताराम कायंदे, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विधानसभेत पाठवले आहे. रविकांत तुपकर हा रस्त्यावरचा माणूस म्हणून यावेळी मतदारांनी खांद्यावर घेऊन झोळीत दोन्ही प्रकारचे दान टाकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चिखली मतदारसंघ सासर आणि सिंदखेडराजा मतदारसंघ माहेर असलेल्या प्रा. नरेंद्र खेडेकर यांची पकड मजबूत आहे. या चारही उमेदवाराच सरळ सरळ लढत होत आहे. परंतु, वसंतराव मगर यांनी नेमकी विकेट कोणाची घेतली हा महत्त्वाचा विषय आहे.
निवडणूक ही समाजावर चालत नाही. तर त्या उमेदवारांची लोकप्रियता किती आहे, यावर अवलंबून असते. मगर यांची लोकप्रियता आहे. परंतु, निवडणूक लढवितांना ज्यांनी आपल्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले त्या लोकांनाच निवडणुकीत मगर विसरले. समाजाची चौकट घट्ट पकडून शेवटपर्यंत बाहेर पडलेच नाही. हिंदू धर्म जागृतीसाठी कार्य करणारा समाज जाधव यांच्या पारड्यात नरेंद्र मोदी यांच्यामुळे मतांची टक्केवारी वाढली असती. नेमकं मगर यांनी आपल्या झोळीत मत वळवून शिवसेनेची वाट रोखली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे घाटावर चार विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदारांची संख्या सात लाख आहे. या सात लाखात ८० टक्के हा शेतकरी आहे. त्यामुळे घाटावर मतदारांनी डोक्यात आणि खांद्यावर ज्यांना घेतले, तो विजयाची सीमारेखा पार केल्याशिवाय राहातं नाही. तेवढं मात्र निश्चित.

जिल्ह्यातील वाढीव मतदान संशयाच्या भोवर्‍यात; प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!