आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कुरुळीत दोन दिवसीय श्री कालभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज यांचा सुरु असलेला उत्सवाची अलोट भाविकांची गर्दी झालेली असताना ही यात्रा कमेटिच्या वतीने भाविकाच्या दर्शनासाठी बॅरेकेट लाऊन शिस्तीत दर्शनबारीने मंदीरात सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता आले. भाविकांची प्रचंड गर्दी श्रींचे दर्शनास झाली. उत्सवानिमित्त काली माता भक्त कालीचरण महाराज यांनी श्री कालभैरवनाथ चरणी मस्तक ठेवले. यावेळी महाराजांचा छोटेखाणी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना महाराजांनी देवस्थाना बाबत सांगितले की हे जागृत देवस्थान असुन वेळोवेळी प्रचिती येत असते.
अशा प्रकारे पहिल्या दिवसाचा मंदीरातून पालखी सोहळा मिरवणुकीसाठी रात्री १०.३० वाजता निघाला. मंदीराच्या बाहेर प्रस्थान करताच फटाक्याची आतषबाजी सुरु झाली. पालखी समोर बालगाड्यावर नगारा त्याच्या पाठीमागे विद्युत छत्रीधारी होते व आकर्षक सजावट केलेली पालखी, छत्री, अब्दागीर, चामर, चवरी असा लवाजाम्या सहीत सोहळा ग्रामप्रदिक्षणेसाठी निघुन परत मंदीरात प्रवेश करुन सुमारे रात्रौ ०१:०० वाजता मंदीराची कवाडे बंद करण्यात आली. दिनांक २ मे रोजी सांयकाळी ४.०० वाजता जंगी निकाली कुस्त्याचा आखाडा झाला. यामध्ये नामांकित मल्ल कुस्ती करण्यासाठी आले होते. हा आखाडा जवळपास सांयकाळी ०८.०० वाजे पर्यंत चालु होता. या दरम्यान शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गावभेट दौरा झाला. याप्रसंगी उमेदवांराचा सत्कार करण्यात आला कुंकुम तिलक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ. ताराबाई गुलाबराव सोनवणे, पैलवान व एनआरएस कोच कुमारी तेजस अंकुश सोनवणे यांनी केले. गावच्यावतीने माजी जिल्हा परीषद सदस्य शांताराम कोंबडीबा सोनवणे यांनी मानाचा फेटा, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या समवेत खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव दत्तात्रय मोहिते पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर रात्री ०९.०० वाजता जल्लोष लावण्यवतीचां या ॲार्केर्स्टा कार्यक्रम होऊन उस्तवाची सांगता झाली. आलेल्या सर्व भाविकांचे आभार उस्तव कमिटीच्यावतीने मानण्यात आले.