आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्रीरामकृष्ण आश्रम सन २००२ पासून अनाथ, गरजू, गरीब कष्टकरी शेतकरी मुलांना शालेय शिक्षण समवेत अध्यात्मिक वारकरी संप्रदायाचे शिक्षण देऊन पालन पोषणाचे कार्य करीत आहे. या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हंणून मुंबईत ग्लोबल इंडियन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. या वेळी जम्मू काश्मीर चे पोलीस कमिशनर शाहिदा प्रवीण गांगुली यांच्या हस्ते मोहन महाराज शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी फिल्म डायरेक्टर टिनू वर्मा, वैभव शर्मा, भारताचे ब्रिगेडियर गौतम गांगुली, एबीपी माझाचे संचालक राजीव खांडेकर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, उद्योगपती आदी मान्यवर उपस्थित होते. श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी आश्रमाचे वतीने ग्लोबल अवॉर्ड स्वीकारला.
या प्रसंगी मोहन महाराज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले पंचवीस वर्षा पासून संस्थेचे कार्य सेवाभावी पणे केल्याची पावती आज खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे माध्यमातून मिळाली. याचा खूप आनंद होत आहे. आळंदी येथे अनाथ, गरीब, गरजू कष्टकरी शेतकरी मुलांचा सांभाळ करत असताना त्या मुलांना शालेय शिक्षण, अध्यात्मिक शिक्षणाचे धडे देऊन त्यांना निर्व्यसनी बनवून, आई-वडिलांचा संभाळ करणे, देशाची सेवा करणे, थोरा मोठ्यांचा आदर करणे, आपली भारतीय संस्कृती जोपासणे अशा पद्धतीने मुले घडवायचं काम संस्था गेले पंचवीस वर्षापासून करीत असल्याचे शिंदे महाराज यांनी सांगितले. आपला भारत देश जर महासत्ता बनवायचा असेल तर आपल्या देशातील तरुण पिढी जर ‘ ज्ञानोबा तुकोबां’ च्या नावाने जर डोलली तर आपला भारत देश महासत्ता झाल्या शिवाय राहणार नाही. असे सन्मानाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. संस्था चालवताना अनेक संकटाचा सामना करून आज पर्यंत आम्ही संस्था चालवत आहे. आम्हाला सध्या स्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती व मुलांच्या उदरनिर्वासाठी मदतीची गरज आहे. आणि ती मदत आपल्या कडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मोहन महाराज शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे आश्रमास ग्लोबल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आळंदी जनहित फाउंडेशनचे चे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी अभिनंदन केले. यामुळे संस्थेचे नाव लौकिक वाढल्याचे त्यांनी सांगितले.