नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी कापसाची लागवड होणार असून कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने यापूर्वी वर्तवला होता त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 760 हेक्टर कापसाची लागवड पूर्ण झाली असून अजूनही कापसाची लागवड सुरू असल्याने हे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे मागील वर्षी कापसाला मिळालेला सर्वाधिक भाव तसेच यावर्षीही कापसाला चांगला भाव मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडी तिला प्राधान्य दिले आहे या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत 76 टक्के पेरणी पूर्ण झाली असून त्यात सर्वाधिक पेरणी कापसाची झाली आहे एकूणच जिल्ह्यात पीक निहाय विचार केल्यास कापसाचा क्षेत्रात वाढ झाली आहे
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामातील दोन लाख 28 हजार 280 क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरी ७६.०९ टक्के एवढा आहे….
सोयाबीन :- २५ हजार ३२६ सरासरी ९२.८२
ज्वारी :- १७ हजार ८७० सरासरी ५८.४८
मका :- २२ हजार ६६९ सरासरी ६८
कापूस :- १ लाख १० हजार ७६० सरासरी ९५.८५
भात :- १४ हजार १८९ सरासरी ५८.७५
तूर :- ११ हजार १६७ सरासरी ८४.४८