Pachhim MaharashtraPARANER

भाऊसाहेब शिंदे यांचे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन : संजीवनी आंधळे

पारनेर (प्रतिनिधी) : कर्जुले हर्या येथील श्री. हरेश्वर विद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मंगळवार दि. १९ भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.  यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी विद्यालयाला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ नेते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे सेवानिवृत्त शिक्षक गो. या. रोकडे सर भाऊसाहेब महाराज रोकडे, टाकळी ढोकेश्वर गटाचे युवा नेते मंगेश रोकडे हे प्रमुख उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कर्जुले हर्या गावच्या सरपंच संजीवनी आंधळे ह्या होत्या.

यावेळी बोलताना सरपंच संजीवनी आंधळे म्हणाल्या की भाऊसाहेब शिंदे यांचे सामाजिक कार्य हे विद्यार्थी युवक खेळाडू महिला या वर्गासाठी प्रामुख्याने सुरू असून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आज हरेश्वर विद्यालयांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सन्मान सोहळा ठेवला व विद्यार्थ्यांचा जो गौरव केला आहे तो कौतुकास्पद असून, अशा या समजशील जपणाऱ्या भाऊसाहेब शिंदे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. यावेळी कर्जुले हर्या येथे हरेश्वर विद्यालयातील कार्यक्रमासाठी हरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव आंधळे, माजी मुख्याध्यापक एकनाथ शिंदे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अनंता शिर्के,  सेवा सोसायटीचे संचालक संदीप आंधळे,  हरेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक लक्ष्मण दाते,  हरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर बर्वे सर,  तसेच हरेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी सेवक शिक्षक रुंद कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!