BuldanaBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

प्रचार थांबवून रविकांत तुपकर थेट शेतबांधावर पोहोचले!

– शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली, अन् तुपकर पती-पत्नी बळीराजासाठी धावून गेले!
– प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी – रविकांत तुपकर

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – अवकाळी पावसाने सध्या जिल्ह्यातील विविध भागात थैमान घातले आहे. या अवकाळी संकटाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकर्‍यांना धीर दिला. निवडणुकीचा काळ सुरु असला तरी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपासून शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळत असताना, तुपकर दाम्पत्याने सर्वप्रथम शेतबांधावर पोहोचत बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच, तातडीने प्रशासनाची संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात.

जिल्ह्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानेही थैमान घातले आहे. १२ एप्रिलरोजी अवकाळी पाऊस आणी वादळी वार्‍याने जिल्ह्यातील काही भागात पिकांचे मोठे नुकसान केले. मेहकर तालुक्यातही बर्‍याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर हे १३ एप्रिल रोजी मेहकर तालुक्यात प्रचार दौर्‍यावर असतांना त्यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन शेतकर्‍यांना धीर देण्यास प्राधान दिले. गोहगाव दांदडे येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचून त्यांनी नुकसानीची पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा, मका यासह इतर पिकांची मोठी हानी झाली आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन रविकांत तुपकरांनी शेतकर्‍यांना धीर दिला. तसेच विश्वी येथे वादळी वार्‍यामुळे झाड कोसळून बुद्ध विहाराचे व काही घरांचेही मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचीही रविकांत तुपकर यांनी पाहणी केली.
आधीच शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबातीत मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे, त्यात पुन्हा शेतकर्‍यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. तर त्यांच्या अर्धांगिनी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनीही काल १२ एप्रिल रोजी मोताळा तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी करुन शेतकर्‍यांना धीर देत प्रशासनाने नुकसानीचे अहवाल शासनस्तरावर पाठवून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाही अ‍ॅड. शर्वरी तुपकर व रविकांत तुपकर या दाम्पंत्याने प्रचार बाजुला ठेऊन शेकर्‍यांच्या बांधावर पोहचून त्यांना धीर देण्याचे काम केले, हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!