BULDHANAKhamgaonVidharbha

रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण : रविकांत तुपकर

खामगाव (तालुका प्रतिनिधी) – सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतीक असणारा सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदनिमित्त शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज खामगाव येथे मुस्लीम समाजबांधवांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे असे सांगत, रविकांत तुपकर यांनी मुस्लीम समाज बांधवांची गळाभेट घेऊन त्यांच्यासोबत रमजान ईदचा आनंद साजरा केला. तुपकर यांच्या गळ्याभेटीचे मुस्लीम बांधवांनी जोरदार स्वागत केले आहे.

सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आज रमजान ईदनिमित्त खामगाव तसेच इतर ठिकाणी मुस्लीम समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व प्रेमाचे आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमज़ान ईद हा सण परस्परांमधील स्नेह व सद्भवाना वृद्धींगत करतो. समाजामध्ये एकतेची भावना व सलोखा अबाधित राहण्यासाठी तसेच मानवतेच्या कल्याणासाठी सर्व मुस्लीम समाजबांधव रमजान ईदला प्रार्थना करतात. रमजान ईद हा प्रेम, आपुलकी व एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. मुस्लीम समाज बांधवांसोबत सहभागी होऊन त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत रविकांत तुपकर यांनी त्यांचा उत्साह वाढविला. मुस्लीम समाज बांधवांकडून रविकांत तुपकरांना मिळालेला प्रतिसाद वाखणण्याजोगा होता. आम्ही आपल्या सोबत आहोत असा विश्वास मुस्लीम समाज बांधवांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. मुस्लीम समाज बांधवांचा मिळणारा प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा रविकांत तुपकर यांच्यासाठी जमेनीची बाजू ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत एकीकडे कट्टरतावादी उमेदवार उभे असताना, दुसरीकडे तुपकर हेच एकमेव मुस्लीम समाजाला चालणारे निरपेक्ष उमेदवार ठरत असल्याने मुस्लीम समाजातून तुपकरांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.


क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन करून रविकांत तुपकरांचा खामगावात निघालेल्या विराट रॅलीत सहभाग

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रॊवणारे, बहुजन समाजाचे उद्धारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खामगावात आज समाजबांधव व बहुजन समाजाच्या वतीने विराट रॅली काढण्यात आली. यावेळी जनसामान्यांचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी निघालेल्या रॅलीत सहभागी होवून क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविकांत तुपकर यांनी खामगाव येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर शहरातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीत ते सहभागी झाले. समाज बांधवांना शुभेच्छा देत प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन त्यांनी उत्साह वाढविला. महात्मा फुलेंचे विचार क्रांति घडविणारे आहेत. सत्यशोधकाच्या याच विचारांवर चालून बुलढाणा जिल्ह्यात नवी क्रांती घडविण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा आणि समर्थन पाहता जिल्ह्यात आता निश्चितच परिवर्तन घडणार आहे, असे मत यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!