BuldanaBULDHANAHead linesVidharbha

संजय गायकवाडांसह पाच अर्ज ठरले अपात्र!

– 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत; भाजपच्यावतीने दाखल विजयराज शिंदेंचा अर्ज अपात्र, मात्र अपक्ष अर्ज ठरला पात्र

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी आज (दि.5) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असल्याने 25 उमेदवार अद्यापही कायम आहेत. दरम्यान, सोमवार, दि. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांत संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज हरिभाऊ शिंदे – भाजप, श्याम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी या पाच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरले. यापैकी विजयराज शिंदे यांचा अपक्ष म्हणून असलेला अर्ज पात्र ठरल्याने एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले आहेत.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 42 नामांकन अर्ज दाखल केले. आज या उमेदवारी अर्जाची छाननी केली. छाननीअंती विजयराज हरिभाऊ शिंदे – अपक्ष, प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तुपकर – अपक्ष, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष, संदीप रामराव शेळके – अपक्ष, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील – अपक्ष, दीपक भानुदास जाधव – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भीमराव इंगळे – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे – भीमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे – बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, गौतम किसनराव मघाडे – बसपा या उमेदवारांचे नामांकन अर्ज पात्र ठरले आहेत. तर, संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज हरिभाऊ शिंदे – भाजप, श्याम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी या पाच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरले. यापैकी विजयराज शिंदे यांचा अपक्ष म्हणून असलेला अर्ज पात्र ठरल्याने एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले आहेत.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. दाखल करण्यात आलेल्या सर्व 29 नामनिर्देशन पत्रांची आज छाननी करण्यात आली. दरम्यान, सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.


लोकसभेसाठी जिल्ह्यातील 2 हजार 266 मतदान केंद्रावर मतदान

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 2 हजार 266 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 प्रसिद्ध केला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी बुलडाणा जिल्ह्यात एकुण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकुण 2 हजार 265 मतदान केंद्रे असून 26-खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 53 ए खामगाव ग्रामीण हे 1 सहायकारी मतदान केंद्र तयार केल्याने एकूण मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 266 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!