Breaking newsCrimeHead linesPune

पुणे हादरले! ऑन ड्यूटी पोलीस कर्मचार्‍याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

– आराम करायला जातो म्हणून काबाईन सोबत नेले व गोळी झाडून घेतली!

पुणे (वैष्णवी मांडेकर) – पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचार्‍याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या लोहियानगर पोलिस चौकीत सकाळी हा प्रकार घडला. रात्रपाळी करणार्‍या या पोलिस कर्मचार्‍याने पोलिस चौकीतच डोक्यात गोळी झाडून घेतली. कौटुंबिक कारणांमुळे या कर्मचार्‍याने हे पाऊल उचलल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. भारत दत्ता आस्मर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

पुणे शहर पोलीस दलाच्या खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या भरत आस्मर याने पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना एका खोलीमध्ये जाऊन व ही खोली बंद करून घेत स्वतःवर गोळी झाडून घेतली. साधारणपणे आठ-दहा वर्षांपूर्वीच हा कर्मचारी पोलीस दलामध्ये भरती झाल्याचे सांगण्यात येते आहे. घटनेनंतर सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. थेट पोलीस चौकीमध्येच एखाद्या कर्मचार्‍यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आस्मर हे खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकी येथे रात्रपाळी ड्युटीवर होते. त्यांनी कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली आहे.


याबाबत खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी माहिती दिली की, खडक पोलिस स्टेशनच्या अखत्यारित येणार्‍या लोहियानगर पोलीस चौकीत पोलिस अंमलदार भारत आस्मर हे नेमणुकीस होते. गुरुवारी रात्री सीआर मोबाइल व्हॅनवर त्यांची एक चालक व एक कर्मचारी यांच्यासह गस्तीसाठी नियुक्ती केली होती. रात्रपाळी करुन पोलिस चौकीत परतल्यानंतर भारत आस्मर हे त्यांच्या सहकार्‍यांना आराम करण्यासाठी चौकीच्या पहिल्या मजल्यावरील विश्रांतीगृहात जातो असे सांगून त्यांच्या नावावर असलेली कार्बाइन बंदुक घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी अचानक स्वतःच्या डोक्यात गोळी मारुन घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने विश्रांतीगृहात धाव घेऊन खोलीत पाहिले असता, स्वत:च्या डोक्यात गोळी मारुन घेत भारत आस्मर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, असे ते म्हणाले. दरम्यान, भारत आस्मर यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? त्याचा तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!