CrimeHead linesPune

लोणीकंदजवळील बिवरी गावात सशस्त्र दरोडा; सोळा लाख रुपयांचे दागिने लंपास

– लोणीकंद परिसरात भीतीचे वातावरण, दरोडेखोंराचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पुणे (वैष्णवी मांडेकर) – लोणाकंदजवळील बिवरी ता. हवेली जि. पुणे येथे मंगळवारी (ता.२) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत, घरातील सदस्यांना मारहाण करत, तब्बल १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात प्रशांत विलास गोते (वय ४० वर्षे, रा. मु. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिवरी हे गाव लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असून, पोलिसांसमोर या ग्रामीण भागामध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान आहे.Pune: 2 tried to commit suicide in Lonikand Police Station premises

लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत गोते आणि त्यांचे कुटुंब रात्री जेवण करून घरामध्ये झोपले होते. मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा कटावणीने उघडला. हत्यारांसह घरामध्ये प्रवेश केला.या सर्व आवाजामुळे घरातील लोक जागे झाले. या सर्वांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील बेडरूममधील कपाटात असलेली पाच लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यासोबतच फिर्यादी गोते यांची पत्नी, आई, बहीण यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांचा गळा कापण्याची धमकी दिली. गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, ओढून काढले. त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली. आईला तोंडावर जबर मारहाण करून कानाला आणि तोंडाला दुखापत करण्यात आली.
चोरट्यानी एकूण १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड दरोडा घालून चोरून नेली. पळून जात असताना चोरट्यांनी पोलिसांना फोन करू नये म्हणून फिर्यादी यांच्या घरातील सर्वांचे फोन घेऊन ते फोडून टाकले. त्यानंतर, आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडल चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, वरिस्थ पोलीस निरीक्षक कैलास करे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरोडेखोरांनी घरातील बेडरूम मधील कपाटातून ५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले. तसेच त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली, आईला तोंडाला जबर मारहाण करून कानाला व तोंडाला जबर दुखापत केली. घरातील व्यक्तींनी पोलिसांना फोन करू नये म्हणून सर्वांचे मोबाईल फोडून टाकले. दरोडेखोरांनी १६ लाख ३० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेली व हे दरोडेखोर पसार झाले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!