Breaking newsBuldanaBULDHANAHead linesVidharbha

लाखांच्या अतिविराट गर्दीने दाखवून दिले, रविकांत तुपकर आजच खासदार झाले!

– ही लढाई ४ एकरवाला खराखुरा शेतकरीविरूद्ध शेकडो कोटींची जमीन असलेला नकली भूमिपुत्र अशी असणार आहे : तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तब्बल एक लाखापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने आज (दि.२) लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घरची चटणी-भाकरी घेऊन स्वयंस्फुर्तीने बुलढाण्यात आलेल्या या अतिविराट समुदयाने शेतकर्‍यांचं लेकरू यंदा संसदेत पाठविण्याचा निर्धार केला असल्याचे प्रत्येकाच्या देहबोलीवरून दिसून येत होते. या लाखोंच्या गर्दीने राज्याला दाखवून दिले, की शेतकर्‍यांचे नेते रविकांत तुपकर हे आजच खासदार झाले आहेत. याप्रसंगी झालेल्या निर्धार सभेत रविकांत तुपकरांनी मावळते खासदार तथा शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्यावर तुफान टीकास्त्र डागले. ही लढाई ४ एकरवाला खराखुरा शेतकरी विरूद्ध शेकडो कोटींची जमीन असलेलला नकली भूमिपुत्र अशी असणार आहे. माझी निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. मायबाप जनता माझ्या जीवतोड संघर्षाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास तुपकरांनी याप्रसंगी व्यक्त केला. अर्ज भरण्यासाठी जाताना बुलढाण्याच्या रस्त्यावर विराट जनसागर पहायाला मिळाला. लोकांनी खांद्यावर उचलून घेत, हलगीच्या निनादात व गगनभेदी घोषणांच्या कल्लोळात तुपकरांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले. जाहीर सभेतील आक्रमक अन् भावनिक भाषणे. हलगी, बैलबंडीसह स्व-खर्चाने घरची चटणी-भाकर खावून बुलढाण्यात लाखोंच्या संख्येत दाखल झालेली अतिविराट गर्दी, व या रेकॉर्डब्रेक गर्दीच्या साक्षीने रविकांत तुपकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे नामांकन म्हणजे स्व-बळावर केलेले शक्तिप्रदर्शन ठरले! राजमाता जिजाऊंच्या या जिल्ह्याने एक नवा इतिहास घडत असल्याने पुन्हा एकदा पाहिले.

स्थानिक जिजामाता व्यापार संकुल नजीकच्या मैदानात शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जाहीर सभा पार पडली. यावेळी तुपकरांनी धुव्वाधार भाषण करीत उपस्थित कार्यकर्त्यांत जोश भरला. आपल्या भाषणातून त्यांनी केवळ आणि केवळ खासदार प्रतापराव जाधव यांनाच लक्ष्य करीत बुलढाणा मतदारसंघातील लढत महायुतीविरुद्ध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारपेठ, कारंजा चौकमार्गे जनसागराची भव्य रॅली निघाली. यानंतर तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आजच्या गर्दीने तुपकरांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून येत आहे. तर २२ वर्षे जनतेसाठी अविरत झटलो आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन तुपकरांनी केले. या निर्धार सभेत रविकांत तुपकरांची दोन रूपे पाहायला मिळाली. लाखोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, युवक, माता भगिनी यांच्याबद्दल बोलतांना ते अतिशय भावनिक झाल्याचे दिसून आले. मात्र खासदार जाधव यांच्यावर बोलताना ते रोखठोक, आक्रमक बोलले. या दोन्ही भाषेतील मनोगताला उपस्थितानी भरभरून टाळ्या देत दाद दिली.भाषणाची सुरुवात करतांना तुपकर म्हणाले की, मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो तुमचं दर्शन घेतो या रेकॉर्डब्रेक गर्दीने मला लढायला बळ दिले आहे. मला जिल्ह्यातल्या व महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगायचं की ही भाड्याने आणलेली माणसे नाहीत, ही स्वतःच्या खर्चाने पदरमोड करून इथे सभेला आली आहेत. २२ वर्षाच्या संघर्षात, तुमचे उपकार जीवात जीव असेपर्यंत विसरू शकणार नाही. अर्ज भरायला येऊ नये म्हणून विरोधकांनी दबाव टाकला, पण जनता दबावाला भीक घालत नाही. आजही तुम्ही त्यांच्या दबावाला भीक घातली नाही, माझी ताकद, इस्टेट, बळ, सर्वस्व तुम्ही आहात. एक ना एक दिवस राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद संपणार आहे, असे सांगून त्यांनी प्रतापराव जाधवांचा परखड भाषेत समाचार घेतला. मागील १५ वर्षात त्यांनी काय विकास केला याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही. जिल्हा भकास करून टाकला, हीच त्यांची उपलब्धी आहे. मेहकरवाल्यांनी अफवा पसरवल्या की, मी अर्ज माघार घेणार म्हणून. मेहकरमध्ये त्यानी अफवांचे पोते भरून ठेवले आहे, मेहकरवाले मुद्दाम करतात. त्यांना यावेळी जनता, शेतकरी पराभवाची धूळ चारणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असेही तुपकरांनी ठणकावून सांगितले.

तुपकरांची दत्तककन्या वैष्णवीच्या भाषणाने आणले उपस्थितांच्या डोळ्यात पाणी!

माझे नाव वैष्णवी भारंबे-तुपकर आहे, कारण मी ७ वर्षाची असतांना माझ्या आई-वडिलांचा अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी माझे २ भावंडे व मी अतिशय लहान होते, आम्हाला कोणाचा आधार नव्हता; पण त्यावेळी माझ्या रविकांतबाबांनी आम्हाला आधार दिला. आमचा सांभाळ केला मी व माझ्या भावंडांना चांगले शिक्षण दिले, त्यामुळेच मी राज्यातील दोन नंबरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रविकांतबाबांमुळेच आम्ही आज चांगले शिक्षण घेत आहोत. वैष्णवीच्या भाषणावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

बायकोचे मंगळसुत्र विकून मोताळा तालुक्यातील गोपाल सिप्पलकर यांनी दिला तुपकरांनी निवडणुकीसाठी निधी!

मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील गोपाल सिप्पलकर यांनी रविकांत तुपकरांना स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसुत्र विकून निधी दिला आहे. सिप्पलकरांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या कृतीमुळे तुपकरांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी ते पैसे वापस केले पण त्या नवरा बायकोने शपथ घातल्यामुळे तुपकरांनी त्यांच्या भावनांचा आदर केला. सिप्पलकरांच्या भावनांपुढे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत, जनतेच्या प्रेमाचे उपकार कुठे फेडू, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे.


विशेष बाब म्हणजे, आजच मावळते खासदार तथा शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त त्यांचीही रॅली व जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी जिल्हाभरातून माणसे आली होती. ही आलेली माणसेदेखील नंतर घोळक्या घोळक्याने रविकांत तुपकरांच्या सभेत पोहोचल्याचे दिसून आले. तुपकरांच्या रॅली व सभेत ही गर्दी पोहोचल्याने रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा आकडा लाखांच्या घरात गेला होता.
———-

“एबीपी माझा”च्या मुलाखतीत शेतकरी नेते रविकांत तुपकर ढसाढसा रडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!