कोट्यवधी भारतीयांचे आयुष्य मोदींच्या गॅरंटीमुळे बदलले – आ. श्वेताताई महाले
चिखली (तालुका प्रतिनिधी) – गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखादे व्रत घेतल्याप्रमाणे देशातील गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत. त्यांचे हे व्रत फळाला आले असून भारतातल्या कोट्यावधी सर्वसामान्य लोकांचे आयुष्य मोदीच्या गॅरंटीमुळे बदलले आहे. त्यामुळे जनता जनार्दन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आपला मतदानरुपी आशीर्वाद निश्चित देईल, असा असा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. दि. १४ मार्च रोजी आयोजित शासकीय योजना लाभार्थी संमेलनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. चिखली मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील हजारो महिला व पुरुष लाभार्थी या संमेलनास उपस्थित होते.
गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून महिला, युवक, शेतकरी, कामगार, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय तसेच विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, दारिद्र्यरेषेखालील नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी केली जात असते. शासनाच्या विविध विभागांमार्फत ही अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेचे लाभ देखील अनेक लाभार्थ्यांना आजवर मिळाले आहेत, मात्र अद्यापही मोठ्या संख्येने या योजनेच्या लाभापासून पात्र लाभार्थी वंचित राहिले आहेत. या गोष्टीची दखल घेऊन आ. श्वेताताई महाले यांच्या पुढाकाराने शासकीय योजना लाभार्थी संमेलनाचे आयोजन चिखली येथे दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सतोष काकडे तहसीलदार, नायब तहसीलदार हरी वीर, पंडितराव देशमुख भाजप शहराध्यक्ष, सुनील पोफळे ता.अध्यक्ष, देवीदास जाधव, डॉ. अजय कुरवाडे मुख्याधिकारी, सरीता पवार गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकर आशिष पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद वेन्डोले महीला व बालविकास अधिकारी, सुरडकर तालुका कृषी अधिकारी, संतोष काळे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, सुभाषआप्पा झगडे, दत्ता सुसर, शैलश बाहेती, सुनंदाताई शिनगारे, अर्चनाताई खबुतरे, निमाताई सोळंकी, तालुका कृषी अधिकारी सवडतकर, सदीय गवळी, टी एच ओ रिंगे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वाघ आदी अधिकारी व पदाधिकारी याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. परमहंस रामकृष्ण मोनीबाबा संस्थांमध्ये आयोजित केलेल्या या संमेलनात मतदारसंघातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी व शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणारे पात्र लाभार्थी उपस्थित पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात विविध शासकीय योजनांच्या लाभ प्रमाणपत्रांचे तसेच विविध वस्तूंचे वितरण आ. श्वेताताई महाले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चिखली मतदार संघात ५ लाखापेक्षा जास्त लाभार्थी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राज्यातील युती सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे अंत्योदय साधण्याचा प्रयत्न केंद्र व राज्याचे शासनाच्या वतीने होत आहे. गेल्या वर्षभरात चिखली विधानसभा मतदार संघातील महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दुष्काळी अनुदान, श्रावण बाळ,संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कृषी विभागाच्या शेतकरी व नमो सन्मान योजना, कृषि यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग व इतर योजना , जिल्हा परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना , महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन , उमेद, समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व इतर विविध शासकीय कार्यालयात मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांची चिखली विधानसभा मतदारसंघातील लाभार्थी संख्या ही जवळपास ५ लाख ३६ हजाराच्या वर जात आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार जवळपास ३ लाखाच्या जवळपास आहे याचाच अर्थ प्रत्येक मतदाराला शासकीय योजनेचा लाभ कोणत्या ना कोणत्या कारणातून मिळालेला आहे. आजच्या शासकीय योजना लाभार्थी संमेलनामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्रांचे व साहित्याचे वाटप झाले प्रतिनिधी स्वरूपात झालेल्या या वाटपामध्ये रमाईआवास योजना, नगरपरिषद ,चिखली अंतर्गत सुनिता समाधान पवार, रेखा शेषराव दाभाडे, शशिकला नारायण काकडे ,कावेरी विनोद खंडाळकर , नंदा मुरलीधर साळवे सोनी बाली भिसे, दिगांबर आश्रुबा चंदनशिव,दिक्षा राहुल जाधव,उषा गंगासागर कस्तुरे यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लक्ष्मीबाई काशिनाथ लहाने ,दिपाली भागवत सोळंके ,सार्थक सुनील हिवाळे यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले. वन विभाग सुनील नारायण सुसर,गजानन पुंडलिक कदम,ज्ञानदेव नामदेव मुळे,संदीप दामोधर फोलाने,दिलीप ज्ञानदेव नरवाडे ,सय्यद शबीर सैय्यद नाबी, वंदना शिवाजी कापसे यांना नुकसान भरपाई देण्यात आली. लेक लाडकी योजना ओवी विकास तायडे, प्रियल ज्ञानेश्वर कानडजे ,रिजा मोहम्मद मुस्ताक ,सिद्धी समाधान साखरे,चैताली गजानन शेळके संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना शिला शंकर गुंजकर , ज्ञानेश्वर आनंदा चव्हाण ,अल्का गोविंदा बिलारी , संपत त्र्यंबक चव्हाण,उज्वला सुनील वाघ, रितेश सुनील वाघ
उज्ज्वला गस योजना –रेखा विजय डुकरे,मंगला राजू काकफळे,लता सुरेश घाडगे,वैशाली संजू तायडे,कल्पना पंजाबराव डोंगरदिवे,परवीन बिबी इद्रीस ,आस्मा चांद देशमुख ,प्रभाताई गजानन गवई,लक्ष्मी नामदेव बोरकर,द्वारकाबाई रोडूबा इंगळे,नीता आकाश गवारे,स्वाती सचिन पाटील,मीराबाई गुलाब वाघमारे ,अर्चना रामेश्वर खंडागळे , वनिता उद्धव राऊत , श्रीमती गीता शंकर कऱ्हाडे,सविता काशीराम हिवराळे , रुख्मिना विष्णू कोकणे,अनिता महेंद्र शेजोळ ,सरला पंजाबराव सोळंकी,चंद्रकोर, मनोहर कऱ्हाडे,मीरा उद्धव भुतेकर,ज्योती पुरुषोत्तम सुरुशे,विद्या अरुण वरुडकर , अंत्योदय योजना लाभ –प्रल्हाद पांडुरंग जाधव,पार्वती साहेबराव राजोडे, सलमाबी शेख अनिस ,गंगुबाई फकीरा राजोडे,कौशल्या अशोक कऱ्हाडे,निर्मला गजू राखोंडे ,सुभद्रा बाई मोतीराम बिल्लारी,द्रोपताबाई पुंडलिक जाधव,राधाबाई साहेबराव मोतेकर, सुगंधाबाई तेजराव पंडित, रंजना राजेंद्र पंडित,रामदास मारोती राखोंडे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी –सारिका दिपक आटोळे ,शेख समीर शेख युसुफ शेख ,शेख अकिल शेख वकील शेख,विलास दिनकर भालेराव,गजानन शामराव येवले, रेणुका संजय खेडेकर शाहरुख अलीयार खान,विजय काशिनाथ गरड,संदीप सुदाम झिने,तेजराव माणिकराव सोळंकी, दगडू सुखदेव हिवाळे, सलमाबी शेख मस्तान रेखाबाई पुंजाजी शिंदे, दीनदयाल अंत्योदय योजना –आरोही महिला संघ NULM चिखली ,आदित्य स्वयं सहाय्यता महिला बचत गट ,अरिहंत सहाय्यता महिला बचत गट, देवांश सहाय्यता महिला बचत गट,जानव्ही सहाय्यता महिला बचत गट,जीनवाणी वुमेन संघ लक्ष्मी सहाय्यता महिला बचत गट,मीराबाई सहाय्यता महिला बचत गट,नंदिनी सहाय्यता महिला बचत गट,प्राची सहाय्यता महिला बचत गट,प्राषिक सहाय्यता महिला बचत गट,राधे राधे सहाय्यता महिला बचत गट,समृद्धी सहाय्यता महिला बचत गट,शरण्य सहाय्यता महिला बचत गट,सीतामाता सहाय्यता महिला बचत गट,शिवाई सहाय्यता महिला बचत गट,शिवभोले सहाय्यता महिला बचत गट,तथागत सहाय्यता महिला बचत गट,वैशाली सहाय्यता महिला बचत गट,ई. बचत गटांना फिरता निधी देण्यात आला . चिखली तालुक्यातील ३३१ तर बुलडाणा तालुक्यातील 262 अगणवाडी सेविकांना त्यांचे काम सुरळीत व डिजिटल व्हावे याकरिता हँडसेट दिले.