धुळे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – धुळे तालुक्यातील निमखेडी येथील शेतकऱ्याच्या मुलाने चार्टट अकाउंटच्या (सी.ए.)परीक्षेत उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवत उत्तुंग भरारी घेतली आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर मोठा आदर्श उभा केला आहे., असे प्रतिपादन निमखेडी येथील समाधान पाटील यांच्या सत्काराप्रसंगी केले.
धुळे शहरालगत असलेले निमखेडी येथील शेतकरी रतिभान त्र्यंंबक पाटील यांचे चिरंजीव समाधान पाटील याने अभ्यासाच्या जोरावर सी.ए.च्या फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात शासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केलेल्या होत्या. संपुर्ण देशात लॉकडाऊन लागल्याने समाधान पाटील देखील घरी परतले. परंतू त्यांची जिद्द होती त्यामुळे त्याने घरी राहून अभ्यासाला सुरुवात केली. अशा बीकट परिस्थितीत सीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांच्या यशाने निमखेडीच्या गावकऱ्यांची मान तर उंचावली आहे. पण त्यांच्या या उत्तुंग भरारीने संबंध ग्रामीण भागातील तरुणांपुढे त्यांनी हा आदर्श उभा केला आहे. असे जि.प.सदस्य राम भदाणे यांनी समाधान पाटील यांच्या सत्काराप्रसंगी बोलले.
समाधान पाटील यांच्या यशाचे निमखेडी येथील मित्रपरिवारासह पंचक्र्रोशीतील सर्व सामाजीक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनाकडून सत्कार व कौतुक होत आहे.
दि.१६ जुलै रोजी युवा नेते जि.प.सदस्य राम भदाणे यांनी त्यांच्या निमखेडी येथील राहत्या घरी जाऊन त्यांचात्त् सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी जापीचे सरपंच भैय्या पाटील, निमखेडी येथील जेष्ठ ग्रामस्थ राजेंंद्र पाटील, सतिष पाटील, दत्तू बापू, भिला जिभाऊ पाटील, पप्पू पाटील, प्रमोद पाटील, दिपक कापडे, लोटन गुजर, बापू ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान पाटील यांनी मिळविलेल्या यशाबद्दल भाजपाचे जेष्ठ नेते माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, माजी सभापती ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांनी देखिल शुभेच्छा दिलेल्या आहेत.
—————————-