Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिखलीत; अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देणार की वार्‍यावर सोडणार?

– पीकविमाही नाही, मालालाही कवड़ीमोल भाव!
– हे सरकार शेतकर्‍यांचे म्हणता, मग हात का आखड़ता? शेतकर्‍यांमध्ये सरकारविषयी प्रचंड़ संताप

बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठव़ड्यात अवकाळी पावसाने जिल्हा झोड़पून काढला. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूरसह रब्बी गहू, हरभरा पिकांचे लाखाचेवर हेक्टरवर नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले तर ८१ मंड़ळात दुष्काळसदृश परिस्थितीही जाहीर करण्यात आली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना शेतकर्‍यांना मदतीची मागणी रेटली पण अद्याप शासनाकड़ून कोणतीही प्रत्यक्ष मदत शेतकर्‍याला देण्यात आली नाही. मालाला कवड़ीमोल भाव असून पीकविमाही मिळाला नाही. हे सरकार शेतकर्‍याचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच छातीठोकपणे सांगतात मग मदत देण्यासाठीच हात का आखड़ता? असा सवाल करत राज्य सरकारबद्दल संताप व रोष शेतकरी व्यक्त करत आहेत. आज, दि.१३ जानेवारीरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात चिखली येथे शिवसंकल्प अभियानाचे निमित्ताने येत असून, आगामी निवड़णुका पाहता, काही घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी मात्र मदतीची आस धरून बसला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने हातची पिके गेली तर उन्हाळ्यात अवकाळीने कहर केल्याने रब्बी पिकेही हातातून निसटली. यासाठी शासनाने हेक्टरी आठ हजार पाचशे रूपये मदत जाहीर केली पण एकरी बाराशे रूपये शेतकर्‍याच्या हातावर टेकवले. तर अवकाळीची अद्यापही काहींना मदत मिळाली नाही. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन केल्यावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २६५ कोटीचा पीकविमा मिळाल्याचे सांगितले जाते तर काही अद्यापही प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पड़ला. त्यामुळे खरिपाची पिके गेली. येलो मोझॅकने उभी सोयाबीन तर बोंड़अळीने कपाशी फस्त केली. कसेबसे एकरी दोन, तीन क्विंटलची झड़ती आली त्यातच कवड़ीमोल भाव असल्याने खर्चही वसूल झाला नाही. त्यातच जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबरमध्ये घाटाखाली पावसाने केल्याने होत्याचे नव्हते झाले. २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात तुफान अवकाळी पाउस पड़ला. यामध्ये मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, चिखलीसह काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंददेखील झाली. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा, भाजीपाला, फळबागा इतर पिकांचे मोठे नुकसान झाले याबाबत ओरड़ झाल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे केले तर जिल्ह्यात ८१ महसूल मंड़ळात दुष्काळसदृश परिस्थीती देखील जाहीर करण्यात आली. यामध्ये घाटाखालील नऊ मंड़ळात पावसाचा मोठा खंड पड़ल्याने काय तो पंचवीस टक्के अग्रीम विमा देण्यात आला पण जिल्ह्यात इतर भागात अद्यापही मदत मिळाली नसल्याची माहिती आहे.
याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाला धारेवर धरले, शासनस्तरावर मिटिंगाही झड़ल्या. पण श्रेयवादाच्या लढाईत त्यांचेच आंदोलन बेदखल करण्यात आले व मदतीचा चेंड़ू राज्य शासनाने केंद्राकड़े टोलवला. तर पीकविमाही अद्याप देण्यात आला नाही. एकंदरीत शेतकर्‍यांचे सरकार म्हणणारेच शेतकर्‍यांकड़े दुर्लक्ष करत असल्याची ओरड़ होत असल्याने शासनाविषयी प्रचंड चिड़ अन् रोष व्यक्त केला जात आहे. आज, १३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाचे निमित्ताने जिल्ह्यातील चिखली येथे येत आहेत. ते नेहमी हे सरकार सामान्यांचे व शेतकर्‍यांचे आहे असे छातीठोकपणे सांग असतात. आगामी निवड़णुका पाहता, काही शेतकरीहिताची घोषणा ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी मात्र ठोस मदतीची आस धरून बसला आहे.


शेतकरी नेते रविकांत तुपकरांचीही चिखलीतील मिसाळवाडीत सभा; शिंदेंवर बोलणार का? जिल्ह्यात चर्चा!

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिखलीत असल्याने ते शेतकरीहिताची काही घोषणा करतात की नाही, याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीदेखील आज संध्याकाळी चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावात सभा आहे. शिंदे यांनी शेतकरीहिताची काही घोषणा केलीच नाही तर मात्र या सभेतून त्यांना तुपकरांच्या घणाघाताला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!