Head linesMaharashtra

रेशन दुकानदारांचा संप मिटला; उद्यापासून रेशन मिळणार!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – दर महिन्याच्या पाच तारखेला कमिशन जमा केले जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, या राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांचा गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातून लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास सुरुवात होईल. राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन याप्रश्नी सविस्तर चर्चा केली होती. या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने कमिशनवाढीसह विविध मागण्यांसाठी १ तारखेपासून बेमुदत बंद पुकारला होता, बुधवारी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकर जाहीर केले जाईल. मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या ५ तारखेला दिली जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला असून, त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. त्यानंतर संघटनांनी संप स्थगित केला.
आज, १० जानेवारी रोजी मुंबई येथे राज्यसंघटना पदाधिकारी अध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष अंबुसकर, जन. सेक्रेटरी यादव, पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शेठ खळदकर, वंदनाताई सातपुते, पिंगळे आण्णा यांच्यासमावेत इतर शिष्टमंडळाने मंत्री भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली होती. आजची बैठक सर्व दुकानदारांना दिलासा देणारी अशी चांगल्या प्रकारे संपन्न झाल्याचे या पदाधिकार्‍यांनी कळवले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!