बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील बिबी व किनगावजट्टू येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच, पत्रकारांमुळेच लोकशाही जीवंत असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.
दिनांक ६ जानेवारीरोजी बिबी येथील चंद्रकला कॉम्पलेसमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार काशिनाथ राऊत हे होते, तर सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहकार विद्या मंदिर, मातोश्री अर्बन, महावितरण कार्यालय, बिबी पोलीस स्टेशन, राजर्षी शाहू बँक, ग्रामपंचायत कार्यालय बिबी अशा विविध ठिकाणी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून नामदेवराव सोनमारे, मधुकर मोहिते, दिनकर काकड, राजकुमार मुळे, रमेश खंडागळे, दिलीप राठोड, देवानंद सानप, सोपान डहाळके, भागवत आटोळे, रामप्रसाद जाधव, प्रदिप चव्हाण, ऋषी दंदाले, गजानन डोईजड, कृष्णा पंधे, अशोक मुंढे या मान्यवर पत्रकारांसह बिबी व परिसरातील इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. मधुकर मोहिते, दिलीप राठोड, देवानंद सानप, गोपाल टेके यांच्यासह इतर मान्यवर मंडळीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पंधे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामप्रसाद जाधव यांनी केले.
दुसरबीड इथून जवळच असलेल्या किनगाव जट्टू येथे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल विकास केंद्रामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रगतिशील शेतकरी विठ्ठल दायमा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम राऊत, विकास मुंडे होते. यावेळी पत्रकार काशिनाथ राऊत, नामदेव सोरमारे, केशव सातपुते, या पत्रकारांचा आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते यांच्यावतीने शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सुनील वायाळकर, संजय जाधव, संदीप मोहरील, कलाबाई मुंडे, राजू जाधव, सतीश वायाळकर, संदीप मोहरील, गणेश काकड, अनिल सानप, यांच्यासह गावकरी हजर होते, कार्यक्रमाच सूत्रसंचालन विनोद सातपुते यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजू नागरे यांनी केले.
——