बिबी (ऋषी दंदाले) – श्री गजानन महाराज संस्थान बिबी यांच्यावतीने गण गण गणात बोतेच्या गजरामध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे शेगावनगरीकडे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्याचे यंदाचे नववे वर्षे आहे.
आज दिनांक २७ डिसेंबररोजी बिबी नगरीतून श्रींच्या पालखीचे सकाळी ९ वाजता प्रस्थान झाले. श्रींच्या पालखीचे रथपूजन बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे, सरपंच मातोश्री गुलमोहरताई साहेब, भास्कर खुळे, दीपक गुलमोहर, सानप साहेब, प्रवीण शेठ कुचेरिया, सुदर्शनशेठ काबरा, कृष्णा पंधे यांच्याहस्ते रथपूजन संपन्न झाले व श्रींच्या पालखीचे नाश्ता व फराळाचे व्यवस्था बिबी नगरीतील दिनकर भाऊ आटोळे यांनी केली होती. मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात ही पालखी श्रींच्या नगरीकडे निघाली. दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी पालखी सोहळ्याची सांगता होईल. पालखी सोहळ्याचे आयोजन श्री सारंगधर महाराज टेके संस्थान विश्वस्त व रमेश कुरंगळ, गजानन मेहर, विक्रम शेरे, विजय महाराज गव्हाणे, संदीप काकड, गोटू महाराज अवगळे, वैभव आंधळे, संजयभाऊ टेके, गजानन झगरे, पांडुरंग मिसाळ असे असंख्य भाविक भक्त दिंडी प्रस्थानसाठी सहभागी झाले होते.