Head linesNAGARPachhim Maharashtra

आमदार राजळेंच्या सांगण्यावरून मला मारहाण; मढी देवस्थान अध्यक्षांचा गंभीर आरोप

अहमदनगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता या मारहाण प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात काल दुपारच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. अध्यक्ष पदावरून झालेल्या या हाणामारीत सात जण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गटातील झालेल्या हाणामारीत लाट्या काठ्या व गज याचा वापर करण्यात आला. या मारहाणीत देवस्थानाचे अध्यक्ष संजय मरकड हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्याबरोबरच विश्वस्त विश्वजीत डोके व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या मारहाण प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले असून देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी गंभीर आरोप आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींवर केला आहे.
मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा धक्कादायक आरोप जखमी झालेले अध्यक्ष संजय मरकड यांनी केला. दरम्यान, मरकड यांच्या आरोपावर आता राजळे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देवस्थानच्या या मुद्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे दिसू लागले आहे.


नेमकं काय घडलं?

श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धूसफूस सुरू होती. म्हणूनच 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंदिराच्या सभागृहात विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्ष बदलाबाबतचा निर्णय बहुमताने घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतांनाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू असतांना काही स्थानिक तरुण त्या वादात पडले. त्यामुळं वाद वाढला. अखेर बाचाबाचीचं रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारीपर्यंत गेलं. दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीनं उपस्थित गावकऱ्यांमध्ये एकच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्यानं यामध्ये काहीजण जखमी झाले. या सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!