– मोर्चात हजारो अतिक्रमणधारक व ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग
बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) – तालुका व शहर विभाग वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अतिक्रमणधारकांना राहत्या जागेला आठ अ आणि कायम पट्टे मिळावे पाहिजे, या प्रमुख मागणीसह असंख्य मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवार, दि. 15 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर विराट मोर्चाचे माध्यमातून धडक दिली. तहसीलदारांनी मोर्चाला सामोरे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व अतिक्रमणधारकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याची आश्वासन दिले.
आज दुपारी शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका बैलजोडी चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहोचल्यानंतर तेथे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मार्गदर्शक जिल्हा नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघोदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर, तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, शहराध्यक्ष बाळूभाऊ भिसे, माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, ज्येष्ठ नेते बि एल खरात, चाऊस भाई, ज्येष्ठ नेते अंबादास जाधव, ज्येष्ठ नेत्या मालताताई निकाळजे यांनी संबोधित केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनात निवासी प्रयोजनार्थ शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना कायम पट्टे देण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांची ऑनलाइन फॉर्म कमी करण्यात यावी, चिखली शहरातील सिद्धार्थ नगर इंदिरानगर आनंदनगर चोखामेळा वस्तीगृह समोर रोहिदास नगर बार भाई मोहल्ला तालुक्यातील अतिक्रमण धारकांना न्याय देण्यात यावा, घरकुल देणे द्यावे, बँकेचे कर्ज देण्यात यावे यासह इतरही मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चामध्ये वासुदेव वानखडे,. शिवाजी गाडे, तालुका उपाध्यक्ष शेषराव जाधव, ज्येष्ठ नेते अक्षय जाधव तालुका उपाध्यक्ष, जितेंद्र निकाळजे तालुका सचिव, महेंद्र हिवाळे तालुका सचिव प्रदीप खंडारे उपाध्यक्ष ,तालुका राजेश खंदारे, सुमित जाधव, रोहित पेंढारकर ,मनोहर चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सतीश पंडागळे, तालुका महासचिव मनोहर घेंवंदे, तालुका उपाध्यक्ष राजू मोरे, एकनाथ बोर्डे, सुधाकर माघाडे, ज्येष्ठ नेते से शेख नासिर शेख सयद, प्रदीप वाकोडे, तालुका सदस्य गजानन अंभोरे, कैलास म्हस्के, अरुण जाधव, वैभव सोनपसारे, विनोद लहाने ,सचिन तायडे, विनोद भिसे, परमेश्वर सोनवणे, दादाराव सोनटक्के ,दादाराव सुरडकर, सिद्धार्थ साळवे, सिद्धार्थ छडीदार, विजया धुरंदर, सयाबाई गवई, शालिनीताई सोनटक्के, आशाबाई साळवे, सोनी भिसे, तुळसाबाई जाधव, केसर आंबोरे, उषा गवई, भामाबाई जाधव, सत्यभामाबाई वानखडे, एकनाथ वानखडे, कलाबाई संदीप धुरंधर, अजीम बी, प्रकाश झाटे, ज्योती वानखडे, गणपत वराडे, गराड मामी, विजय हेलगे, बाळु दांदडे बबन गवई, तुळशीराम धुरंधर, लता धंदरे, निलेश पराड, अनंत वाथे ,अजय जाधव, देवराव खरात, किशोर जाधव, देवानंद वानखडे राजा भाई शेख फिरोज पवन सोनेनै विपुल साबळे सतिश घेंवंदे योगेश हिवाळे ,गणेश बोर्डे दीपक साळवे, प्रवीण साळवे, सागर काळे सलीम भाई लकडी वाले राजेश गोफने सुरेश अवसरमोल ,गणेश कांबळे विलास वानखडे विनोद वानखडे नागेश साळवे, विलास अवसरमोल अनिता सिद्धार्थ साळवे शालिनीताई सोनटक्के माया साळवे आशाताई सोनवणे धुरपदाबाई शेजवळ, शोभाबाई नरवाडे, जिजाबाई संजय मिसाळ शिलाबाई कांबळे उषा जाधव अमोल साबळे, राहुल कांबळे गजानन डोंगरदिवे, रवी मस्के श्याम अवसरमोल यांच्यासह चिखली तालुका व शहरातील कार्यकर्ते अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.