आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त पदासाठी आळंदीतील स्थानिक नागरिक, ग्रामस्थ यांनी मुलाखती देऊन देखील तीन विश्वस्तांचे नियुक्ती जाहीर झाल्या. यात एक ही विश्वस्त स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांतून न घेतल्याने विश्वस्तांच्या निवडीत स्थानिक ग्रामस्थांना डावलल्याने या घटनेच्या निषेधार्थ तीर्थक्षेत्र आळंदी मंगळवारी ( दि. ५ ) बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी आळंदी ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकी नंतर झालेल्या निर्णया प्रमाणे मंगळवारी आळंदी बंद ठेवण्यात येत असल्याचे निवेदन आळंदी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, रोहीदास तापकीर, राहुल चिताळकर, बबनराव कुऱ्हाडे, चैतन्य महाराज लोंढे, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, रामदास भोसले, अशोक रंधवे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक रमेश गोगावले, अशोक उमरगेकर, आनंदराव मुंगसे, आळंदी ग्रामस्थ शंकर कुऱ्हाडे, संजय घुंडरे, किरण येळवंडे, विलास कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, शिरीषकुमार कारेकर, विठ्ठल घुंडरे, संजय वडगावकर, संकेत वाघमारे, महेश जाधव, सुनिल रानवडे, श्रीधर घुंडरे, राहुल चव्हाण, सुरेश घुंडरे आदी आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
पुणे जिल्हा प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी यांनी नुकत्याच आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्ताच्या निवडी जाहीर केल्या. यामध्ये तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीने नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक करण्यात आली. यामध्ये आळंदीतील स्थानिकांना हेतु पुरस्कार डावलण्यात आल्याची भावना आळंदीकरांत आहे. आळंदी ग्रामस्थांन मध्ये तीव्र नाराजी असून या नाराजीचा सूर आळंदीत झालेल्या बैठकीत उमटला. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान मध्ये झालेल्या नवीन विश्वस्त निवडीने प्रचंड नाराजी असून या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी ( दि.५ ) आळंदी बंद रहाणार असल्याची घोषणा आळंदी बैठकीत करण्यात आली. त्या प्रमाणे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील यांनी आळंदी ग्रामस्थ यांनी दिलेले निवेदन पोलीस प्रशासनाचे वतीने स्वीकारले.
येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत या संदर्भात सविस्तर चर्चा विचार विनियमासाठी बैठक झाली. यावेळी आळंदी संस्थांन विश्वस्तपदी स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांची निवड व्हावी यासाठी या पूर्वी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. या कडे संबंधित प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांचे अर्जाचा विचार न करता पुढे शिफारसी देण्यात आल्या. आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची निवड झाली. या शिवाय तत्कालीन विश्वस्तांना अनेक वेळा मुदत वाढ देण्यात आली. या मुदत वाढीच्या निर्णयावर देखील आळंदीत नाराजी आहे. आळंदी ग्रामस्थां तर्फे या निवड प्रक्रियेचा जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित प्रशासनाने लक्ष न दिल्यास येत्या कार्तिकी यात्रेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांना तर्फे माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील यांनी दिला आहे.