BuldanaHead linesMaharashtraMumbaiVidharbha
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलांनी रूग्णालयात जाऊन घेतली तुपकरांची भेट
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवारांकडूनही तब्येतीची विचारपूस
मुंबई (प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मुंबईतील सैफी रूग्णालयात जाऊन भेट घेतली, तसेच प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तुपकरांकडून सोयाबीन, कापूसप्रश्नी असलेल्या मागण्या समजून घेतल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनीदेखील दूरध्वनीद्वारे तुपकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व विश्रांतीचा सल्ला दिला. सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम झाला असून, रक्तदाब व रक्तातील साखरदेखील घसरलेली आहे. त्यांना अचानक चक्कर आल्यानंतर तातडीने रूग्णालयात दाखल केले गेले होते.
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुंबईतील चैनी रोडवरील सैफी रुग्णालयात भेट घेतली, पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत चांगलीच खालावली असून, त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाशाभाई पटेल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच तुपकरांकडून सोयाबीन कापूस प्रश्नी असलेल्या मागण्या समजून घेतल्या. एकीकडे, सदाभाऊ खोत, पाशाभाई पटेल यांच्यासारखे नेते तुपकरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पाऊले मात्र अद्याप सैफी रूग्णालयाकडे वळलेले नाहीत. त्यावरून शेट्टी व तुपकर यांच्यातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
———–