चिखली (महेंद्र हिवाळे) – अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांच्या हिरव्या स्वप्नाचा चुराडा केला आहे. बळीराजाला सावरण्यासाठी आर्थिक मदतीचा मोठा हात हवा. त्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्यात यावी. आपत्तीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी चिखली तालुका येत्या काळात उग्र अशा प्रकारचे आंदोलन करेल, असेही चिखली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. हे निवेदन देतेवेळी राहुल वानखेडे (तालुकाध्यक्ष), संजु जाधव (तालुका उपाध्यक्ष), राहुल साळवे (तालुका महासचिव), संजु वानखेडे (तालुका उपाध्यक्ष), गौतम वानखेडे (तालुका सचिव), शरद आराख (केळवद सर्कलप्रमुख), नितिन जाधव (जेष्ठ कार्यकर्ते), अनिल खरात, संतोष वानखडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————-