LONARVidharbha

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या भगिनींना MCC क्रिकेट क्लबचा मदतीचा हात

– सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी, गरमागरम चहा

बिबी (ऋषी दंदाले) – येथील ग्रामीण रूग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना तसेच त्यांच्यासोबतच्या कुटुंबीयांना सकाळी गरम पाणी, चहाची मोफत सोय एमसीसी क्रिकेट क्लबच्यावतीने करण्यात आली असून, त्यांच्या या दातृत्वाबद्दल शेकडो महिला भगिनींनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या क्रिकेट ग्रूपच्यावतीने नेहमीच गरजुंना मदतीचा हात दिला जातो.

बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात राष्ट्रीय कुटुंब नियोजन कल्याण योजनेंतर्गत महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी बिबी व परिसरातील महिला येथे येत असतात. या महिलांसाठी एमसीसी क्रिकेट क्लब, या युवकांच्या ग्रूपच्यावतीने मदतीचा हात दिला जातो. या महिलांना सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी, गरमागरम चहा, बिस्कीटे आदी वाटप केले जातात. या सेवेबद्दल महिला भगिनी या युवा सदस्यांना मनापासून धन्यवाद देतात. या मंगेश क्रिकेट क्लब (एमसीसी) मध्ये बिबी येथील सरपंचपुत्र दीपकभाऊ गुलमोहर, उपसरपंच भास्करभाऊ खुळे, कैलास मोरे (शंभुराजे ग्रुप अध्यक्ष), सदस्य प्रशांत इंगळे, प्रतीक गावडे, दुर्गेश राठोड, सोनू मोरे, अजिंक्य आटोळे, रामप्रसाद खंडागळे, मेहबूब भाई, पप्पू भाऊ पंधे, ओम मुळे आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!