BuldanaHead linesVidharbha

सोयंदेव येथे मनोज जरांगे पाटलांचा पुतळा जाळला!

– ओबीसी-मराठा वाद पेटण्याची चिन्हे पाहाता ‘पोलिस अ‍ॅलर्ट मोड’वर!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाला विरोध होत असल्याचे दिसून येत असून, तालुक्यातील सोयंदेव येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता पाहाता, पोलिसांनी सतर्कता बाळगण्यास सुरूवात केली आहे. पुतळा जाळणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील सोयंदेव येथे आज (दि.२१) सकाळी दहा वाजताच्या सुमारे नऊ जणांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. यानंतर जरांगे पाटील यांचा पुतळा जाळला. याची माहिती मिळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. संध्याकाळी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस हवालदार अब्दुल रहेमान परसुवाले यांनी स्वतः फिर्याद दिली. प्रकरणी सुमारे नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीमध्ये सोपान नामदेव खरात, सज्जन गणेश शेळके, अरुण जगन खरात, संदीप जनार्दन खरात, गणेश आसाराम नागरे यासह तीन ते चार जणांचा समावेश आहे. या घटनेची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्याने पोलिस ‘अ‍ॅलर्ट मोड’वर असल्याचे दिसून आले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!