पेठ, ता. चिखली (मेघा जाधव) – चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे पती तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले पाटील यांनी पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. संकटे ही येतच असतात, त्यावर मात करून आपली ध्येय साध्य करा, असे ते याप्रसंगी म्हणालेत.
ज्ञानेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींशी, तसेच शिक्षकांशी विद्याधर महाले यांनी खास संवाद साधून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संबोधित करताना सांगितले, की विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता ध्येयाने सर्व अडीअडचणींना सामोरे गेले पाहिजेत. आपल्या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी अशी संकटे येतच असतात. परंतु, त्यावर मात करत स्वतःच्या शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे नाव रोषण करावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मार्गदर्शन करून आपल्या बालपणाच्या आठवणीही विद्यार्थ्यांना सांगितल्यात. श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर शेळके यांनी विद्याधर महाले यांचे स्वागत केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
————-