BuldanaBULDHANACrimeHead linesVidharbhaWomen's World

झेडपीच्या मास्तरने विद्यार्थिनीसोबतच तोंड काळे केले; तीनवेळा केला बलात्कार!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्यातून गुरू-शिष्येच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेल्या शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर शाळेत सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बुलढाणा पोलिसांनी या नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सतीश विक्रम मोरे (वय ४१) असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, पीडित विद्यार्थिनी अवघी १३ वर्षांची आहे.
हाच तो नराधम मास्तर मोरे, यानेच अल्पवयीन मुलीसोबत तोंड काळे केले.

सतीश मोरे या नराधम शिक्षकाने १६ सप्टेंबररोजी या पीडित विद्यार्थिनीला ती शाळेत जात असताना गाठून त्याच्या बोलोरो गाडीत घेतले व गाडीतच अश्लील चाळे करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर असाच प्रकार त्याने पुन्हा दोनवेळा करून या मुलीचे लैंगिक शोषण केले. तुझे शाळेतील कपडे बदलतानाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ते व्हायरल करण्याची धमकी देऊन हा नराधम शिक्षक या कोवळ्या मुलीच्या शरीराचे लचके तोडत होता. वारंवार बलात्कार होत असल्याने या मुलीची तब्येत बिघडली. याबाबत तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने तातडीने बुलढाणा गाठून मुलीची विचारपूस केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने बुलढाणा पोलिस ठाणे गाठून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून आरोपी शिक्षकावर पोक्सोसह इतर कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या ताब्यातून बोलोरो गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नीलेश लोधी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!