आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गरजवंत मराठा शांततेच्या मार्गाने आळंदीत साखळी उपोषणास बसले असून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा संदेश दिला आहे. त्या प्रमाणे आळंदी पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे वतीने आळंदीत सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणास वाढता प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान शुक्रवारी ( दि. २७ ) कॅन्डल मार्च आयोजित करीत माऊलीं मंदिरा समोर जोरदार घोषणा देत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी साखळी उपोषण स्थळ ते महाद्वार पर्यंत कॅन्डल मार्च झाला. माऊली मंदिर परिसर उजळला. यावेळी पसायदान म्हणून मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणात देत मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोरील महाद्वार येथे उपस्थित राहून मराठा समाजाचे आरक्षणासाठी कँडल मार्च मध्ये मोठ्या संख्येने विविध वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या साधकांनी सहभाग घेतला. मराठा बांधवांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सकल मराठा समाजाचे वतीने कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीस राज्य सरकारने केवळ तारखा दिल्यात. मात्र प्रश्न प्रलंबित ठेवल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीस कॅन्डल मार्च झाला.
यावेळी साखळी उपोषणास बसलेले अरुण कुरे, शशिकांतराजे जाधव, माजी नगरसेवक डी. डी. भोसले. पाटील, समन्वयक अर्जुन मेदनकर, स्वप्नील जगताप, आनंदराव मुंगसे, सचिन गिलबिले, राहुल चव्हाण, दिनेश घुले,प्रशांत कुऱ्हाडे, सचिन शिंदे, रामदास दाभाडे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, ज्ञानेश्वर घुंडरे, भागवत शेजूळ, श्रीकांत बोरावके, दिनेश कुऱ्हाडे, महादेव पाखरे, वारकरी संप्रदायातील विद्यार्थी, महाराज मंडळी व महीला उपस्थित होते.
श्री संत नगद नारायण महाराज अध्यात्मिक गुरुकुलचे प्रमुख बाळू महाराज कागडे, ज्ञानविश्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रमुख अभिजीत महाराज देशमुख, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, संचालक सचिन महाराज शिंदे, शांतिब्रम्ह वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख सुनील महाराज वलेकर यांचे संस्थेतील साधक मोठ्या सहभागी झाले होते.यावेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.